पान:अमेरिका पथदर्शक.pdf/46

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३३
प्रश्र्नोत्तरें.

 प्रश्र्न २४--कोणत्या प्रकारचें काम तेथें मिळतें ?
 उ०--अमेरिकेंत विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचीं कामें करावीं लागतात. उन्हाळ्यांत शेतावर जाऊन काम करावें लागतें, किंवा बागेंमध्यें फळे वेंचण्याकरितां जावें लागतें किंवा Hops वेंचण्याकरितां इकडें तिकडें जावें लागतें. विश्र्वविद्यालयाचें काम सुरूं असतां भांडीं घासणें, घरसाफ करणें, भट्टीत कोळशें टाकणें, गवत कापणें इत्यादि प्रकारचीं कामें त्यांस करावीं लागतात. ज्यांना मजुरीचा धंदाच करावयाचा असतो, त्यांना कायम मजुरीचा शोध करावा लागतों. लांकडे फोडण्याच्या गिरण्या, सडकांवर किंवा शेतक-यांच्या मोठमोठ्या शेतांवर त्यांस काम करावें लागतें. सर्व वर्षभर त्यांना तेंच काम पुरूं शकतें. त्यांना सहा ते आठ रुपयांपर्यंत रोजची मजुरी मिळते. एखाद्या वर्षी मजुरीचा दर कमी असतो. ज्या दिवसांत अध्यक्षाच्या निडवणुकीची धामधूम सुरूं असतें, त्या दिवसांत शेतक-यांचें काम कमी असतें, अर्थात् मजुरांची मागणी कमी असते व मजुरीचा दरहि कमी होतो.

 अशाच प्रकारचें काम अमेरिकेंत आमच्या हिंदी बांधवांना करावें लागतें. फार थोंडें इसम दुकानदारीचा किंवा फेरीवाल्याचा धंदा करतात. आपल्या देशांतील जाणत्या लोकांनीं तेथें जाऊन व्यापार करून,संपत्ति मिळविली पाहिजे; व आपल्या देशाचें वैभव वाढविलें पाहिजे. परंतु आपल्या लोकांना सोंवळ्या ओंवळ्याच्या विचित्र कल्पनांनीं अद्याप सोडलेलें नाहीं. बिचारे मजूर मात्र तेथें जाऊन आपल्या शक्तिनुसार द्रव्यार्जन करीत आहेत व अशा रीतीनें आपल्या देशाचें नांव त्या देशांत गाजवीत आहेत.
 प्रश्र २५-- स्थापत्य (एंजिनियरींग ) वगैरे संबंधी शिक्षण देणारें चांगलें विश्र्वविद्यालय कोणतें ? व डेंटिस्ट्रीचें काम शिकण्याकरितां कोठें गेलें पाहिजे ? हें कृपा करून सांगावें
 उ०-—पेनसिलव्हॅनिया संस्थानांतील पिट्सबर्ग शहरी कॉर्नेजी साहेबांचे एक मोठें विश्र्वविद्यालय आहे. तेथें हरप्रकारचें स्थापत्याचें काम शिकविण्यांत येतें. तेथें जाऊन भारतीय विद्यार्थी चांगल्या रीतीनें स्थापण्याचें शिक्षण घेऊं शकतात. तेथें शिक्षणाला खर्चहि कमी येतो. सर्व सामान्यत: प्रत्येक संस्थानच्या विश्र्वविद्यालयांत स्थापत्याचें शिक्षण देण्याची व्यवस्था
  अ. ३