पान:अमेरिका पथदर्शक.pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३२
अमेरिका-पथ-दर्शक

रांच्या त्रासांतून सुटका करून घेण्याकरितां आपल्या हिंदी विद्यार्थी बंधूंकरितां व इतर सद्गृहस्थांकरितां एक युक्ति सुचवून ठेवतों.

 १९०९ च्या उन्हाळ्यांत मी सियेटल शहरांत काम करीत होतों. तेथें बरेचसे गोरे मजूरहि काम करीत होते. एका श्रीमंत मनुष्यानें आपल्यासाठीं एक इमारत बांधण्यास सुरूवात केली होती. ट्रॅफ (Trough) मध्यें विटा भरून मीं दुस-या मजूरांस देत होतों. माझ्या शेजारीं काम करीत असलेला गोरा मजूर फार धूर्त व चलाख होता. जेव्हां जेव्हां त्याला संधि मिळे, तेव्हां तो मला '( Damn hindu )' ' हलकट हिंदी मजूरा' अशा शेलक्या शब्दांनीं हिणवीत असे. प्रथम प्रथम हिंदी स्वभावाला अनुसरून त्याच्या असल्या शिव्या मी मुकाट्यानें ऐकून घेत असें व तंटा करण्याचें होतां होईतों टाळत असें. एक दिवस त्यानें मला मायबहिणीची शिवी दिली. माझ्या सहनशीलतेचा ह्या दिवशीं परोत्कर्ष झाला. लगेंच मी त्याला जमीनीवर धडकन् पाडलें व त्याच्या छातीवर गुडघे टेकून त्याला यथेच्छ चोप दिला व नंतर त्याला सोडून दिलें. सोडतांना त्याला बजाविलें, "बच्चाजी, आजवर शिव्या दिल्या त्या दिल्या, आतां तूं शिवी दे म्हणजे तुला आजच्या पेक्षांहि अधिक जबर दक्षिणा मिळेल.”
 मला त्रास देण्याचा तोच त्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर त्यानें मला फिरून कधीहि त्रास दिला नाहीं. उलट त्या दिवसापासून तो मला “भाई" ह्या प्रेमळ शब्दानें संबोधूं लागला. ह्या करितां पाश्र्चात्य सभ्यतेच्या पुढील नियमानुसार हिंदी बांधवांनी नेहमीं निर्भय असावे. कोणाचीहि भीति बाळगू नये.
 “The good old plan,
 That he shauld take who has the power,
 And he should keep who can."
 अर्थात् "सर्वांत चांगला व पुरातन मार्ग म्हटला म्हणजे, बलवान असेल त्यानेंच हातांत सत्ता बाळगावी,व जो बलवान असेल त्यानेंच ह्या जगांत राहावें”.
 एखाद्या गो-या माणसानें आपली खोडी केली किंवा आपल्याला शिवी दिलीं कीं, लागलींच त्याला चांगला चोप द्यावा. असें केलें तरच आपल्याला तेथें प्रतिष्ठापूर्वक राहतां येईल व आपला बोज राहील.