पान:अमेरिका पथदर्शक.pdf/40

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२७
प्रश्र्नोत्तरें.

करतां येईल; तेथें कांही त्रास पडणार नाहीं. मीं हातानेंच स्वयंपाक करीत असें. वाशिंग्टन युनिव्हर्सिटींत शिकत असणा-या बहुतेक विद्यार्थ्यांनी अशीच व्यवस्था केली होती. कारण, असें केलें असतां थोडया खर्चांत विद्यार्जन करतां येतें.

 प्रश्न १७--हिंदी विद्यार्थ्यांना मदत करण्याकरतां अमेरिकेंत एखादी संस्था स्थापन करण्यांत आली आहे काय ?

 उ०--अलीकडे अशी एक संस्था स्थापण्यांत आलेली आहे. ह्या संस्थेला ‘हिंदुस्थान असोशिएशन ऑफ अमेरिका,' हें नांव आहे. ह्या संस्थेचा उद्देश हिंदी विद्यार्थ्यांना मदत करणें हा आहे. संस्थेची मुख्य कचेरी 500 Riverside Drive, New york N. Y., U. S. A. येथें आहे. होतां होईतों स्वतःची अडचण स्वतःच भागविण्यास शिकलें पाहिजे. कोणी कोणास सर्वतोपरी मदत करूं शकत नाहीं. एखाद्यानें एखाद्या विद्यार्थ्यांस मदत केली, किंवा एखाद्या महान देशभक्तानें दुस-या एखाद्या विद्यार्थ्यांस मदत केली तर हीं केवळ अपवादात्मक उदाहरणें आहेत. अमेरिकेस जाण्यास उद्यत झालेल्या इसमानें, हें समजून असावें कीं, आपल्यावर येणा-या संकटांना आपणांसच तोड द्यावें लागेल. दुसरा कोणी त्याला मदत करणार नाही.
 प्रश्न १८--जे विद्यार्थी मुळींच मांस खात नाहींत ते देखील आपली व्यवस्था लावून घेऊं शकतील काय ?
 उत्तर--ह्याकरिता सर्व प्रकारचे हाल सहन करण्याची संवय ठेवली पाहिजे. मला ह्या नियमाचें पालन करण्याकरितां बरेंच कष्ट सोसावें लागले. येथून जातांना जहाजावर हातानें स्वयंपाक करण्याची व्यवस्था झाली तर बरेंच झालें. असें न झाल्यास, जहाजावरील बल्लवाचार्याशीं सूत जमविलें पाहिजे, त्याला कांहीं पैसे चारले, म्हणजे काम भागूं शकेल. मग तो आपल्यास मांस न टाकलेलें पदार्थ खाण्यास देण्याची व्यवस्था करूं शकतो. अमेरिकेस पोहोंचल्या वर फळफळावळ, दूध,लोणी वगैरे पुष्कळ प्रकारचे पदार्थ मिळूं शकतात.हॉटेलमध्यें गेलें असतां मोठ्या सावधगिरीनें खाण्याचे पदार्थ मागवावें लागतात; कारण, तेथें खाण्याच्या बहुतेक पदार्थांत मांस, अंडी, चरबी इत्यादि वस्तूंचा उपयोग केलेला असतो. खाणा-यानें तेथील नोकरांकडून सर्व माहिती अगोदर विचारून घ्यावी, नाहीतर अजाणपणें मांस तुमच्या पोटांत जाईल, व एकदां आंत