पान:अमेरिका पथदर्शक.pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१७
प्रश्र्नोत्तरें.

चांगला सुपीक देश आहे आहे. जरी येथें अमेरिकेइतके मजुरीचें काम मिळत नाही, तरी येथील काम कुली पणापेक्षां सहस्रपटीनें चांगलें आहे. ह्या मार्गानें जाणाऱ्यांनी मुंबईहून जिनोव्यास जावें व तेथून मेक्झिकोस जाणा-या आगबोटीनें मेक्झिकोला जावें. जिनोआ येथें कोणत्याहि आगबोट कंपनीच्या कचेरींत ह्यासंबंधीं सर्व माहिती मिळेल.
 प्रश्न २--ह्या दोन मार्गांनीं जातांना वाटेंत कोणकोणतीं महत्त्वाचीं बंदरें पडतात, व कोणकोणत्या कंपनीकडून आगबोटीची टिकीटें काढावी लागतात?
 उत्तर--जपानतर्फे जाऊं इच्छिणा-या प्रवाशांनी कलकत्त्यास तिकीट काढावें. जोंवर शक्य असेल तोवर इंग्रजी कंपनीपासून अलिप्त असावें. जपानी 'निपन युसेन कैसा ' (Nipon Yuseu Kaisha) च्या कचेरीत टिकीट खरेदी करावें, किंवा कलकत्त्याहून हांगकांगला जावे व तेथून एखाद्या अमेरिकन कंपनीच्या जहाजावरून पुढें जावे. ह्या वाटेनें कलकत्ता, पिनांग, सिंगापूर, हांगकांग, शंघाई, कोबे, व योकोहामा ही बंदरें लागतात. अमेरिकन कंपन्यांच्या जहाजावरून गेल्यास होनोलुलु हें एक बंदर आणखी लागतें. योकोहामाच्या पुढे गेलें म्हणजे, आपलें जहाज नव्या जगांत शिरलें, असें भासायला लागतें. ह्या वाटेनें जाऊं इच्छिणा-या प्रवाश्यांना पुष्कळ कंपन्यांच्या कचे-या कलकत्त्यांत आढळणार नाहीत परंतु हांगकागला गेल्यावर ब-याच कंपन्यांच्या कचे-या दृष्टीस पडतात. हा मार्ग धनिक विद्यार्थी प्रवाशी व व्यापारी लोकांकरितां विशेष चांगला आहे. मजूर लोकाकरितां मात्र हा मार्ग योग्य नाही; मजूराकरितां हा मार्ग जवळ जवळ बंदच करण्यांत आला आहे. इंग्रजी जाणणारा मजूर किंवा एखादा निर्धन विद्यार्थी अमेरिकन पोषाख करून अमेरिकेस जाऊं शकेल परंतु इतर मजूरांकरितां हा मार्ग बंद आहे असेंच समजावें.
 युरोपच्या मार्गानें जाणा-या प्रवाश्यांना मुंबई किंवा कोलंबो येथें तिकीट खरेदी करणें अवश्य आहे. कोलंबोहून टिकीट घेणें फार चांगलें, कारण तेथें पुष्कळ कपन्यांची जहाजें येऊन थांबतात. Norddeutscher Lloyd (नॉर्डेटशर लॉइड) कंपनीची जहाजे कोलंबोहून मॉर्सेलीसला जातात. ह्या कंपनीचीं जहाजें मार्सेलिसहून पुढें अमेरिकेस जातात. ह्या कंपनीचें जहाज न मिळाल्यास 'Hamburg American.' कंपनीच्या जहाजातून जातां

 अ. २