पान:अमेरिका पथदर्शक.pdf/29

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
अमेरिका-पथ-दर्शक.



प्रश्नोत्तरें.

 प्रश्र्न--अमेरिका कोठें आहे व त्या देशाला जाण्याचा मार्ग कोणता ?
 उत्तर--नवीन खंडांत 'युनायटेड स्टेट्स' नावांचा एक मोठा विस्तीर्ण देश आहे; हा देश युरोपइतका मोठा असून, ह्याचे क्षेत्रफळ हिंदुस्थानच्या दुप्पटीहून अधिक आहे. हा देश नवीन खंडाच्या उत्तर भागांत असून ह्याच्या उत्तरेस कानडा, दक्षिणेस मेक्झिको, पूर्वेस अटलांटिक महासागर व पश्चिमेस पासिफिक महासागर व ब्रिटिश कोलंबिया आहे. ह्या देशाला जाण्याला बरेच मार्ग आहेत. परंतु दोन मोठे मार्ग विशेष प्रसिद्ध आहेत. एक कलकत्त्याहून जपान, व जपानहून पॅसिफिक महासागरांतून जाऊन सॅनफ्रन्सिस्को येथें, किंवा सियेटल येथें, उतरतां येतें, तो मार्ग; व दुसरा मुंबईद्वारा युरोप व अटलांटिक महासागरांतून जाऊन न्युयॉर्क किंवा सियेटल येथें उतरतां येतें, तो मार्ग; व मुंबईद्वारा युरोप व अटलांटिक महासागरांतून जाऊन न्युयार्क किंवा बोस्टनला उतरतां येतें, तो मार्ग. पहिल्या मार्गानें मनुष्य अमेरिकेच्या पश्चिम भागांत जाऊन पोहोंचतों व दुस-या मार्गानें अमेरिकेच्या पूर्व भागांत जाऊन पोहोंचतो.
 ह्या दोन प्रमुख मार्गांशिवाय अमेरिकेस जाण्यास आणखीहि इतर मार्ग आहेत. मुंबईहून जिनोआला (इटली) जावें, तेथून फ्रेन्सिसी बंदरावरून आगागाडीनें मार्सेलिसला जावें व तेथून आगबोटीनें निघून अमेरिकेच्या दक्षिण भागांत असलेल्या गाँलवस्टन नांवांच्या बंदरावर पोहोंचतां येतें. तेथून आगगाडीने उत्तर अमेरिकेस जातां येतें. किंवा मेक्झिकोमधील एखाद्या बंदरावर उतरून तेथून आगगाडीनें युनायटेड स्टेट्समध्यें जातां येतें. ह्या वाटेने जाणारे विद्यार्थी गरीब असल्यास, त्यांना मेक्झिकोंत काही दिवस राहून व द्रव्यार्जन करून नंतर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत जातां येईल. मेक्झिको हा एक