पान:अमेरिका पथदर्शक.pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२
अमेरिका-पथ-दर्शक

राहिलों कारण माझे जवळ अमेरिकेस जाण्यापुरतें पुरेसें पैसे नव्हतें. ज्या दिवशीं ही सर्व मंडळी हांगकांग सोडून गेली,त्या दिवशीं माझ्या मनाला मुळीच स्वस्थता नव्हती. सारा दिवस मी आपल्या खोलींत पडून होतों. एका वेळी एक विचार करावा,दुस-या वेळी दुसराच.कोणत्याच गोष्टीचा निश्र्चय असा होत नव्हता. प्रथम असा विचार केला की, पहिले सयामला जावें, व तेथें थोडेबहुत पैसे मिळाल्यावर अमेरिकेस जावें. असा विचार करून सयामचें टिकीट काढण्याकरितां मी टिकीट ऑफिसांत गेलों. परंतु कांही कारणामुळे त्या दिवशीं सयामकडील टिकीटेंच बंद होती. अशा प्रकारच्या अनिश्र्चित स्थितींत माझे कित्येक दिवस निघून गेले. माझ्याजवळ मनीलाला (फिलिपाईनची राजधानी) जाण्यापुरते पैसे होते. तेव्हां मी शेवटीं मनीलास जाण्याचें निश्र्चित केलें. मजजवळ मनीलास जाण्यापुरते पैसे नसते, तरी तितके द्रव्य मला हांगकांगच्या एकदोघां मित्रांकडून मिळू शकलें असतें.
 मनीला हें शहर फिलीपाईन बेटांची राजधानी आहे. ह्यामध्यें अनेक बेटांचा अंतर्भाव होत असून ही फिलिपाईन बेटें अमेरिकन सरकारच्या अमलांखाली आहेत. येथे प्रथम स्पेन लोकांचें राज्य होतें. परंतु स्पेन लोकांनीं फिलीपाईन लोकांवर फार जुलूम अत्याचार केले. ह्यामुळें फिलीपाईन लोक स्पेन लोकांशी असंतुष्ट असत. जोपर्यंत दैव प्रतिकूल होतें, तोंपर्यंत ते तरी बिचारे काय करणार? कालांतरानें दैवाचा फेरा त्यांना अनुकूल झाला. अमेरिकेचें 'मेन' नांवाचें जहाज स्पेन लोकांच्या चुकीनें समुद्रांत बुडाले. ह्यावरून स्पेन व अमेरिका ह्यामध्ये युद्ध जुंपले. युद्धांत अमेरिकेचा जय होऊन फिलीपाईन बेटे अमेरिकेने घेतली. तेव्हां पासून फिलीपाईन लोकांचे भाग्यहि उदयास येऊं लागलें.
 आतां मनीलाचें वृत्त ऐका. मनीलामध्ये उतरण्यास मला काहीच त्रास झाला नाही. माझी दृष्टी थोडीशी मंद आहे तरी तिचा कोणत्याही रोगाशीं संबंध नसल्यामुळें मला तेथें उतरण्याचे बाबतीत प्रतिबंध करण्यांत आला नाहीं. शिवाय माझ्याजवळ दाखविण्याकरितां पुरेसें पैसेहि होते. मनीलास पोहोंचल्यावर निराळा उद्योग करून पैसे मिळवण्याचे मी ठरविले; व त्याप्रमाणे मनीलाच्या वर्तमानपत्रांमध्यें धार्मिक विषयावर लेख लिहावयास मीं सुरुवात केली: व अशा प्रकारें धर्मप्रचाराच्या कार्याला आरंभ केला. पहिल्या चारपांच महिन्यांत मला कांहीं फायदा