पान:अमेरिका पथदर्शक.pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
मी अमेरिकेस कसा पोहोंचलों

 पुढे चाललों. लांब शेंडी असलेला चीनी मनुष्य रिक्षा ओढीत पळत असतांना पाहिला म्हणजे फार मौज वाटते. आपल्या देशांत मेमसाहेबांच्या गाड्या ओढणा-या किरानी बाया व इतर हिंदु इसम बरेच पाहण्यांत येतात. परंतु त्यांना पाहून आपलें अंत:करण केव्हांही करुणेने द्रवत नाहीं.किंबहुना अशा हीन स्थितीत दिवस काढणें आपल्या लोकांस एक सामान्य गोष्ट वाटतें. मनुष्य स्वभावच असा आहे कीं, स्वतःस मेाठा समजणारा इसम दुसऱ्यांच्या हिताकडे लक्ष देऊं शकत नाहीं. म्हणूनच तर आपल्या बांधवांची अशी दुर्दशा आहे.
 वाचकहो, चला आपण पीनांगच्या गल्ल्यांतून जिनरक्षांमधून हिंडून येऊं. बाजारांतील दुकानांच्या दोन्हीं बाजूकडील उंच उंच इमारतींच्या रांगाकडे बघत आम्हीं शीखांच्या-गुरुद्वार-ठिकाणाकडे चाललों. रस्त्यांत ठिकठिकाणीं शीख शिपाई दिसत होते. ह्यांची उंच शरीरयष्टि व लांब लांब दाढया भारत देशाच्या मोठेपणाला शोभणा-याच होत्या. त्याबरोबरच मनाला असेंहि वाटत होतें कीं, हे भारत मातेचे सुपुत्र येथें अशा स्थितीत कां बरें उभें राहिलें ! असा विचार मनांत आला कीं, मनाला फार वाईट वाटे. परंतु भवितव्यतेपुढे कोणाचा इलाज चालणार? सद्यःस्थितीचा संबंध व्यक्तिसमुदायाशीं असल्यास व्यक्तिला स्वतःच्या इच्छेप्रमाणें सर्व समाजाचीं परिस्थिति एकदम कशी बदलवितां येईल ?
 आतां आम्हीं शीख मंदिरांत पोहोंचलों. पीनांग शहरांतील हे मंदिर शीखांचे खरोखरींच एक जिवंत स्मारक आहे. जी माणसें हिंदुस्थानांतून इकडे येतात, जे नोकरी मिळवण्याच्या खटपटींत असतात किंवा नोकरी सुटल्यामुळे ज्यांना नोकरीची गरज असते, असे सर्व लोक ह्याठिकाणीं येऊन मुक्काम करतात. चांगली पक्की इमारत, मजबूत सुंदर फरशी व मोठमोठीं दालनें ह्यांचा प्रवाशांना विश्रांतिकरतां चांगलाच उपयोग होतो. येथील ग्रन्थी (धर्मगुरु) फारच सज्जन गृहस्थ आहेत. आम्हांस त्यांनीं फार चांगल्या रीतीनें वागविले.आमच्या खाण्यापिण्याची त्यांनीं चांगली व्यवस्था केली. आम्ही तीन चार दिवस येथेंच होतो. माझ्या मित्राजवळ अमेरिकेस जाण्याकरतां पुरेसें पैसे होते म्हणून त्यानें सिंगापूरला जाणा-या आगबोटींचे टिकीट काढलें व मला एकटें मागें टाकून तो पुढें निघून गेला. मी मनाशीच म्हटलें "आपण जरी मला सोडलें तरी, ईश्वर मला