पान:अमेरिका पथदर्शक.pdf/2

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
अमेरिका व जर्मनीचे सुप्रसिध्द प्रवासी स्वामी


श्रीसत्यदेव परिव्राजक रचित


अभिनव-ग्रंथमाला-विनंति पत्रक.


संपादक - श्रीधर नारायण हुद्दार वाङ्मयविशारद.


 स्वामी श्रीसत्यदेव ह्यांच्या खास परवानगीनें त्यांच्या देशभभक्तिपर, स्फूर्तिदायक, बोधप्रद, उदात्त व अभिनव विचारांनीं भरलेल्या आणि हृदयंगम व चित्ताकर्षक भाषेत लिहिलेल्या उत्तमोत्तम ग्रंथांचा मराठी वाचकांना परिचय करून देण्याचे हेतूनें अभिनव-ग्रंथमाला सुरुं करण्यांत येत आहे. सहरहू मालेचें प्रथम पुष्प अमेरिका पथदर्शक आज प्रसिद्ध होत असून दुसरें पुष्प ‘अमेरिका दिग्दर्शन'हे सुमारें तीन महिन्यांनीं प्रसिद्ध करण्यांत येईल. त्यानंतर 'वेदांताचा विजयमंत्र', 'राजर्षिभीष्म,' ‘मानवी अधिकार,' ‘अमेरिका भ्रमण' वगैरे (ज्यांच्या हिंदी भाषेत पांच पांच सहा सहा आवृल्या निघून सर्वत्र प्रचार झाली आहे अशीं ) १५-१६ पुस्तकें वर्षीतून ४|५ या प्रमाणें प्रसिद्ध करण्यांत येतील. मालेच्या ग्राहकांचे खालीलप्रमाणें वर्ग करण्यांत आले आहेत:-
 १ हितचिंतक-एक किंवा दोन मासिक हप्त्यांनी २० रु. ची रक्कम देणारांस मालेचे हितचिंतक समजलें जाईल. मालेतर्फे प्रसिद्ध होणा-या प्रत्येक पुस्तकाची एकेक प्रत हितचिंतकांस मोफत पाठवण्यांत येईल; व मालेत प्रसिध्द करावयाचीं सर्व ( १५-१६) पुस्तके सुमारें तीन वर्षांत प्रसिद्ध झाल्यावर हितचिंतकाची रक्कम रु. २० ज्यांची त्यांस परत करण्यांत येईल.
 २ सहाय्यक:-एकदम पांच रुपये देणारांस मालेचे सहाय्यक समजले जाईल. व मालेतर्फे प्रसिध्द होणा-या प्रत्येक कुस्तकाची एकेक प्रत सहाय्यकास मोफत पाठविण्यांत येईल.