पान:अमेरिका पथदर्शक.pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
अमेरिका-पथ-दर्शक

असेल तितकें चांगलें असतें. पुष्कळ कपडे नेण्याची जरूरी नाहीं. केवळ एक गरम सूट असला की पुरें आहे. बाकीचे कपडे तेथे गेल्यावर विकत घेतां येतात. एक काळा सूट अवश्य असावा; कारण अमेरिकन लोक काळे कपडे फार वापरतात.
 आठ मे रोजीं जहाजावर जावयाचें होतें. अगदीं सकाळीच आम्ही दोघेही आपले सामान घेऊन कलकत्ता 'व्हार्फ'वर गेलों;तेथें एक विचित्र दृश्य पहावयास सांपडले. चार पांचशें शीख आपआपलीं आवडीचीं पदें आनंदानें गात होते. ते इतके आनंदांत होते कीं, जणूं काय एखाद्या विवाहप्रसंगाकरितांच ते जात आहेत.आम्हीं तेथें गेल्यावर प्रथम डॉक्टरच्या तपासणी संबंधीं चवकशी केली. तेव्हां डॉक्टर -तपासणीचे नियम फार कडक आहेत असें आम्हांस कंळलें. तिस-या वर्गाच्या उतारूंच्या पेटींतील सर्व कपडे काढून त्यास वाफारा (Steam bath) देण्यांत येतो. तेव्हां मित्रांचा सल्ला घेऊन पीनांगपर्यंत सेकंड क्लासनेंच जावयाचें आम्ही ठरविलें. एका बंगाली डॉक्टरानींही असाच सल्ला दिला माझ्याबरोबर येणारा मित्र 'आपकार' कंपनीच्या आफिसांत गेला व त्यानें टिकीटें खरेदी केली.आतां डॉक्टरी परीक्षा केवळ नाडी पाहाण्यापुरतीच राहिली.लागलींच आम्ही लहान लहान नांवांवर आपलें सामान ठेऊन जहाजावर पाठविलें. माझें मित्र सामान पाठविण्यांत गुंतलें असतां मी घाटावर उभा राहून आपल्याशींच विचार करीत होतो. मीं म्हणालो,"आतां मात्र मी हिंदुस्थानांतून बाहर जाणार!परदेशांत काय अवस्था होईल कोणास ठाऊक !” एखाद्या अल्पवयी बालकाप्रमाणें माझे चित्त अगदीं अस्थिर झालें. परंतु जेव्हां मी शीखांकडे बघितलें व त्यांच्या स्थितीचा विचार केला, तेव्हां मला माझ्या भितरेपणाची लाज वाटली.डोळ्याची आसवें पुसून थोडा धीर धरला. इतक्यांत माझें मित्र आले व आम्हीं दोघेहि नांवेवर बसून जहाजाकडे चाललों. जहाजावरील कप्तानानें आमच्याशीं अधिकच निदर्यतेचें वर्तन कलें. त्यानें आम्हांस एका अंधा-या खेालीत बसावयास जागा दिली, त्या खेालीत वारा खेळत नव्हता, व प्रकाशही मुळीच नव्हता. आम्हीं तक्रार केली, तेव्हां कप्तानानें आम्हांस कळविलें, “ दुस-या खोल्या रिकाम्या नाहींत. तुम्हांला ह्याच खोलीत निर्वाह करावा लागेल.” उलट ज्या एकदोन युरोपीयन इसमांनीं डेकचे