पान:अभिवादन (Abhivadan).pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


श्री. ग. व्यं. माडखोलकर । ९१


या मंडळींच्या लिखाणातील दोष मोजून दाखविणे कठीण नाही. कोणत्याच लेखकाच्या लिखाणातील दोष मोजून दाखविणे कठीण नसते. पण एखादी वाङमयकृती आणि एखादा लेखक चाळीस चाळीस वर्षे समाजापुढे उभा राहतो, तो या दोषांच्या आधारे उभा नसतो. या दोषांवर मात करणारी काही गणसंपदा असते. तिची ओझरती ओळखही जर वाङमयसमीक्षेला करून देता आली नाही, तर ती वाङमयसमीक्षा आपले श्रेय हुकलेली समीक्षा मानली पाहिजे. जे टिकले आणि तुमच्या चौकटीत वसते, ते या चौकटीमुळे टिकले, हे सांगणे सोपे असते. पण, जे टिकले आणि वाचकप्रिय राहिले- पण समीक्षेच्या चौकटीत त्या वाङमयाचे सामर्थ्य सांगता येणे जमले नाही- तिथे आपण उत्तर काय देणार? अशा वेळी एक मार्ग नवीन उत्तरे शोधण्याचा असतो. तो मराठी समीक्षकांना मानवत नाही. दुसरा मार्ग, आपले समीक्षणाचे निकष अगदीच जुजवी आणि तात्पुरते आहेत, असे सांगण्याचा असतो. तेही टीकाकारांना मानवत नाही. गेली चाळीस वर्षे माडखोलकरांचा वाचकवर्ग का टिकून राहिला, या प्रश्नाचे उत्तर मराठी समीक्षेने दिलेले नाही.
 माडखोलकरांच्या कादंबऱ्यांची वाचकप्रियता पाहताना एका मुद्द्याचा फोलपणा नेहमी लक्षात घेतला पाहिजे. त्यांच्या कादंबऱ्यांत शंगारचित्रण विपुल आहे. 'नागकन्ये' सारख्या कादंबरीत हे शृंगारचित्रण अधिक भडक असे झालेले आहे. कोणे एके काळी, माडखोलकरांच्या कादंबऱ्यांत वासनोत्तेजकता आहे काय ? आणि या कादंबऱ्या अश्लील आहेत काय ? याची गंभीर चर्चा मराठी कादंबरीत झालेली आहे. माडखोलकरांच्या कादंबऱ्यांतील शंगार अपरिहार्य आहे काय ? तो कलात्मक आहे काय? या प्रश्नाची चर्चा करणे निराळे आणि या अतिरेकी शंगारामुळे त्यांच्या कादंवऱ्या वाचकप्रिय होतात हे म्हणणे निराळे. माडखोलकरांच्या कादवांत वाचकांना अत्यंत आवडत्या ठरलेल्या कादंवन्या 'भंगलेले देऊळ', 'कान्ता', 'नवे संसार', 'चंदनवाडी', 'रुविमणी' आणि 'सत्यभामा' या आहेत. या कादंबऱ्यांच्यापैकी एकही कादंबरी भडक शंगाराला फारसा वाव देणारी नाही. शृंगाराव्यतिरिक्त माडखोलकरांच्या जवळ अजून काही तरी आहे, असा याचा अर्थ आहे. शृंगारिक वर्णनांचे वैशिष्टय असे असते की, त्यांच्या फॅशन्स दर पाच-दहा वर्षाला बदलतात. शृंगार हेच ज्यांचे सामर्थ्य होते, असे अनेक लेखक आले आणि गेले. माडखोलकरांचे वाचकाच्या मनातील स्थान अजून अढळ आहे. समजा, माडखोलकरांची ही वाचकातील स्थिर मान्यता अजून चाळीस वर्षे टिकली, तर उद्या माडखोलकरांचा समावेश मराठीतील अभिजात लेखकांच्यामध्ये करावा लागणार आहे. ह. ना. आपटे, वामन मल्हार आणि केतकर यांची आस्था जशी मराठीत कायम आहे, तशी फडके, खांडेकर, माडखोलकर यांच्या विषयीची आस्थाही कायम राहण्याचा संभव आहे. काळाच्या ओघात टिकून राहिलेल्या कलाकृती निर्दोष