पान:अभिवादन (Abhivadan).pdf/90

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


श्री. ग. त्र्यं. माडखोलकर । ८७


की, त्यांना राष्ट्राची एकात्मता हवी आहे, त्यांना आधुनिक भारत हा परंपरेच्या वारशातून उचलून आर्थिक होणारा असा व्हायला हवा आहे. श्रद्धेच्या दृष्टीने ते वारसदार असतीलच, तर न्या. रानड्यांचे आहेत.
 यामुळेच माडखोलकर यांचे मित्रवर्तृळ नेहमी संमिश्र राहिले. जीवनाचा व्याप चौरस असावा, मते स्वतंत्र असावीत, मतांची वाधा माणुसकीच्या संबंधाना येऊ नये, विरोध मतांची माणसे मित्र असावीत, हे त्यांच्यावाबत नित्य घडले. एकीकडे डॉ. मुंजे, डॉ. हेडगेवार, गोळवलकरगुरुजी, नवाथे ही मंडळी, तर दुसरीकडे कॉ. डांगे, कॉ. जोगळेकर, कॉ. मिरजकर, श्री. कणिक ही मंडळी त्यांची मित्र राहिली. काका कालेलकर, शंकरराव देव, दादा धर्माधिकारी असे कडवे गांधीवादी त्यांचे मित्र आहेत. त्यांच्या पत्नी शांताबाई या गांधीजींच्यावर श्रद्धा ठेवणान्या, अखिल भारतीय महिला संमेलनात भाग घेणान्या, नागपूरच्या प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांच्यापैकी होत्या. या मित्रवर्तृळात रिपब्लिकन पक्षापासून शेतकरी-कामकरी पक्षापर्यत, रॉयिस्ट व लाल निशाण गटापासून संपूर्ण सनातन्यांच्यापर्यंत अशी विविध थरांतील मंडळी आहेत. इतक्या सर्व जातिधर्मातील, राजकीय पक्षांतील विविध विचारांची माणसे माडखोलकरांची मित्र राहिली, याचा एक अर्थ, त्यांच्यात सहिष्णुता आणि सौजन्य फार मोठे आहे, हा होतो. त्याचा दुसरा अर्थ, लोकशाही विचारस्वातंत्र्य तिथे मुरलेले आहे, हा होतो.
 पण, याहीखेरीज माडखोलकरांनी साहित्यिक, कवी, नाटककार, कलावंत, संशोधक, शिक्षणशास्त्रज्ञ असाही एक मोठा परिवार गोळा केला आहे. जीवनाला एकच परिणाम राजकारणाचे नसते. जीवनात ज्ञान, कला, साहित्य यांनाही महत्त्व असते. सत्य, शिव आणि सौंदर्य यांच्या उपासनेचे अनंत प्रकार जीवनात चालू असतात. सहस्रधारांनी वाढणाऱ्या या जीवनात आपणही समृद्धपणे वावरले पाहिजे, असे माडखोलकरांनी मानले. पत्रकार व टीकाकार या नात्यांनी त्यांनी केलेले विपुल लिखाण या त्यांच्या चौरसपणाचे द्योतक आहे. या त्यांच्या चौरसपणात सहानुभूती ठिकठिकाणी कमी पडते, अशी माझ्यासारख्याची तक्रार आहे. पण, त्यांच्या मनात एखाद्याचा कायम द्वेष इतका असावा की, गुणग्रहण आणि मूल्यमापन अशक्य व्हावे, अशी वेळ कधी आलेली दिसणार नाही. त्यांच्या समतोल मूल्यमापनाच्या दृष्टीन त्यांचे मृत्युलेख अत्यंत महत्त्वाचे आहेत.
 माडखोलकरांचा मूळ पिड पत्रकाराचा आहे. पत्रकाराच्या नजरेतील सावधपणा आणि चौकसपणा हा त्यांचा स्थायीभाव आहे. तरुण वयात त्यांचा आणि नरसिंह चिंतामण केळकरांचा संबंध आला. एके काळी केळकरांना त्यांनी गुरुस्थानीही मानले होते. केळकरांच्या सहवासात असताना,जीवनाच्या चौरस विकासाची जाण माडखोलकरांना आली असावी, असा माझा अंदाज आहे. तेव्हापासून राज