________________
प्रकरणे झटकून टाकावीच लागतात. याहीमुळे खूप मोठे शत्रु होतात. माणसाचा स्वभाव मोठा गमतीचा आहे. जो कान उघडे ठेवतो आणि ओठ बंद ठेवतो, त्याच्याजवळ विश्वासाने माणूस आपले रहस्य मोकळे करतो. पण, अशा ओठ बंद ठेवणाऱ्याच्याविषयी तो संपूर्णपणे आपला आहे, अशी खात्री कुणालाच वाटत नाही. त्याच्याविषयी परकेपणा राहातोच. लोकांना वाटते, आपल्या आवडत्या साहित्यिकाने खूप वाचावे, खूप लिहावे. शिवाय त्यांना असेही वाटते की, आपण जाऊ तेव्हा वाटेल तितका वेळ त्याने नप्पा मारीत बसावे. या दोन बाबी विसंवादी आहेत, असे जाणवतच नाही.
लोक माडखोलकरांच्याविपयी सतत प्रतिकूल बोलत असतात, याची माझ्या लक्षात आलेली ही काही परिस्थितिजन्य कारणे आहेत. सगळी कारणे इतकीच असणार नाहीत. कोण्या तरी निकट व्यक्तिगत संबंध असणान्या सुहृदाने त्यांच्या वैयक्तिक गुणदोपांचाही काही खुलासा केला पाहिजे. डॉ. सुनील सुभेदारांसारखे सुहृद या विषयावर लिहिण्याचे अधिकारी आहेत. त्यात मी पडणार नाही.
जेव्हापासून मी विचार करू लागलो, त्या मते फुटण्याच्या आरंभकाळी माडखोलकरांच्याविषयी सतत प्रतिकूल बोलण्याची इच्छा माझ्याही मनात उसळी मारत असे. ज्यांनी मला जीवन समजावून घेण्यास शिकवले, त्या गुरुजनांनी माझ्या या पद्धतीचा चटकन निषेध केला. माझ्या आठवणीप्रमाणे, हैद्रावादला 'नागकन्या' या कादंबरीवर, ती अश्लील आहे, असा एक साहित्यिक अभियोग ठरविण्यात आला होता. ही कादंबरी अश्लील आहे, या वाजूने अर्थातच आम्ही मंडळी होतो. खरे म्हणजे ती अश्लील आहे, असा गवगवा असल्यामुळेच आम्ही सोळा-सतरा वर्षांच्या मुलांनी ती ताबडतोब वाचून काढलेली होती. ठरल्याप्रमाणे कार्यक्रम झाला. अनुकूल, प्रतिकूल बाजूने साक्षी व वकिलांच्या जबान्या झाल्या. आणि असा हा कार्यक्रम संपल्यानंतर आमचे सारे ज्येष्ठ वाङमयीन नेते, माडखोलकरांच्याविषयी बोलण्याच्या ऐवजी, कार्यक्रम कसा झाला, यावरच बोलू लागले. मला राहावले नाही. म्हणून, शेवटी एका जणाजवळ मी माझे मन मोकळे करून विचारले, " ही अशी चर्चा काय करता ? शेवटी माडखोलकरांना अश्लीलतेच्या गुन्हयातून मुक्त करण्यासाठी म्हणून तुम्ही हा कार्यक्रम ठेवला होता काय ?" मला अनपेक्षितपणे असे विचारण्यात आले की, “ अश्लीलतेचा खटला 'नागकन्या' कादंबरीवरच का भरला, हे तुला कळते काय ?" मी म्हटले, " तुम्ही सांगा." ते म्हणाले, " असे कार्यक्रम कादंबरीवर चौरस चर्चा व्हावी यासाठी असतात. ते लेखकाला शिक्षा देण्यासाठी नसतात. माडखोलकर आपले आहेत, म्हणूनच त्यांच्यावर हा खटला भरण्यात आला आहे."
मला ही गोष्ट लवकर समजणे कठीण गेले. पण तिथे एक गोष्ट मी शिकलो.
-