पान:अभिवादन (Abhivadan).pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


६२ । अभिवादन



माझे मत आहे. सूचित अर्थ असेल तिथे काव्य असतेच असे नाही. म्हणून ध्वनी काव्याचा आत्मा नव्हे ही भूमिका आपण स्वीकारायला काय हरकत आहे ? महाराज म्हणाले, तशी हरकत काहीच नाही. पण योगायोगाने जर कोणी ध्वनी काव्याचा आत्मा आहे असे म्हटले असेल तर त्या सगळ्यांचे म्हणणे चूक ठरविण्याची मला हिंमत होत नाही. मी जोगांचे पुस्तक वाचलेलेच होते. मी म्हणालो काव्याचा आत्मा ध्वनी आहे हे आनंदवर्धनाचे मत चुकीचे आहे असे म्हणताना मला कोणतीही भीती वाटत नाही. कहाळेकर म्हणाले, तशी भीती मलाही वाटत नाही. पण सूचितार्थ म्हणजे ध्वनी हा तुमचा अर्थ योगायोगाने जोगांचाही अर्थ आहे. तो आनंदवर्धनाला अभिप्रेत आहे याविषयी माझी खात्री नाही. मी म्हटले, आनंदवर्धनाला काय अभिप्रेत आहे ? कहाळेकर म्हणाले, ते मलाही नक्की माहीत नाही. पण ज्याअर्थी हजार वर्षे लोक आनंदवर्धनाला महत्त्व देत आले त्याअर्थी त्याने काहीतरी विचार करण्याजोगे म्हटले असावे. ते एकाएकी समजून न घेता चूक म्हणण्याचे धैर्य मला नाही.
 इथून आमच्या चचांना रंगत येऊ लागली. मी गंभीरपणे अभ्यास करतो आहे हे कहाळेकरांच्या लक्षात आले तसतसे टाळाटाळी सोडून देऊन ते अधिक मोकळेपणाने माझ्याशी चर्चा करू लागले. त्यांनी ध्वनी हा काव्याच्या बाहेर नसतो या भूमिकेकडे माझे लक्ष वेधले. ते मला म्हणाले, ध्वनी काव्यातच असतो, काव्याबाहेर नसतो अशी एक भूमिका आहे. ज्यांनी ही भूमिका घेतली त्यांना काव्याच्या वाहेरसुद्धा सूचितार्थ असतो हे माहिती नव्हते असे तरी आपण म्हटले पाहिजे. जर असे म्हणायचे असेल तर या मंडळींचे भाषाज्ञान अगदीच कच्चे होते, हा निर्णय देणे आपल्याला भाग आहे. दशरथ बाप झाला या वाक्याने त्याच्या बायकोला मूल झाले हेही सुचवले जाते इतके ज्यांना कळत नाही, या मंडळींना गंभीर विचारवंत म्हणणे कठीण आहे आणि जर दैनंदिन भाषेतसुद्धा अर्थ सुचविले जातात हे या विचारवंतांना कळत असेल आणि तरीही ते, ध्वनी फक्त काव्यातच असतो, असे आग्रहाने म्हणत असतील तर या मंडळींना ध्वनी या शब्दाने सूचित अर्थापेक्षा काही तरी निराळे अभिप्रेत असावे असे मानणे भाग आहे. आणि जर आपण भाषेतील वाक्यांना असणारा सूचित अर्थ म्हणजे ध्वनी नव्हे, याहून ध्वनीची कल्पना काही निराळी आहे असे मानणार असू तर ज्यांनी ज्यांनी ध्वनी म्हणजे सूचित अर्थ अशी ध्वनीची व्याख्या केली आहे, त्या सर्वांचे म्हणणे चूक आहे असे आपण म्हटले पाहिजे. ध्वनीचे उदाहरण म्हणून 'सूर्य मावळला ' असे एखादे वाक्य नोंदवणे व त्याचे अर्थ प्रत्येकाला निराळे कळतात म्हणून तिथे ध्वनी आहे हे सांगणे मूलतःच चुकीचे मानले पाहिजे. अशा प्रकारची दैनंदिन व्यवहारातील वाक्य ध्वनीची उदाहरणे होऊ शकणार नाहीत. या मुद्द्यावर तुम्ही एकदा नक्की विचार