पान:अभिवादन (Abhivadan).pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

मुक्त-मयूरांची भारते । २३

हेर, शेतकरी इत्यादीसंबंधीचे उल्लेख संकलित केलेच आहेत. क्षत्रियांना गायनवादन-नर्तनादी कला ब्राह्मण शिकवीत, धनुविद्याही ब्राह्मणच शिकवीत हेही त्यांनी नोंदविले आहे. यात त्यांनीच नोंदविलेल्या पुराव्यांवरून वर्णाश्रमाच्या कल्पनेत चपखल बसणारा ब्राह्मणवर्ण त्याही वेळी अस्तित्वात नव्हता, हे सांगणारा पुरावा आहे. अण्णा म्हणतात, " त्या काळी ब्राह्मण समाज सर्व वणांना पूज्य असे. इतर सर्व वर्णाच्या स्त्रियांच्या ठिकाणी प्रजोत्पादन करण्याचा त्यांना हक्क असे. आणि हा हक्क त्यांनी आपले आचरण व चारित्र्य यांवर मिळवला होता." या सर्व विवेचनात कठीण वाव आहे ती ही की, ब्राह्मणांचे हक्क, त्यांची कर्तव्ये, त्यांचा मोठेपणा इ. सर्व वर्णन ब्राह्मणांनीच केले आहे व हे वर्णन बुद्धोत्तर कालात सूतसंस्कृतीचे वाङमय पचवून टाकताना ब्राह्मणांनी केले आहे. उपनिषदे जर पाहिली तर ब्राह्मणांनीही अध्यात्मविद्येचे धडे ज्यांच्यापासून घ्यावेत अशा क्षत्रियराजांच्या कथांनी भरलेली आहेत. त्यामुळे तत्कालीन ब्राह्मणसमाजाचे खरोखरीचे समाजव्यवस्थेतील स्थान ठरविणे बरेच कठीण पडते.
 जातिव्यवस्था ही वर्णाश्रमव्यवस्थेचे एक पुढचे रूप आहे. जाती वर्णसंकरांतून निर्माण झाल्या- असे संशोधकांत प्रचलित असणारे अजून एक लाडके मत आहे. अण्णांनी तिन्ही बावींना आपली मान्यता दिली आहे. त्यांनी काही जाती संकरोद्भव मानल्या; काही जाती अनार्यांना आर्यसंस्कृतीत स्थान देताना निर्माण झाल्या असे मानले; इतर काही जाती धंदेवाईकांच्या संघांतून निर्माण झाल्या, असेही मानले. आजच्या आपल्या ज्ञानाच्या अवस्थेत या तीनही शक्यता स्वीकृत मानणे आवश्यक आहे. मात्र अण्णांनी जातींची जी अनेकविध नावे दिली आहेत ती मान्य करता येतीलच असे नाही. 'क्षत्ता' ही जात ब्राह्मण-शूद्रसंबंधांतून निर्माण होणारी आहे. 'कुंड ' ही जात ' जार' संततीची आहे, ‘गोलक 'ही जात विधवा संततीची आहे. अशा रीतीने जाती बनत असतात हे पुस्तकात लिहिणे ठीक आहे. पण प्रत्यक्षात असणे कठीण आहे. कारण अशा प्रकारच्या जाती जर वास्तविक असल्या तर त्याचा अर्थ कुठल्याही स्त्रीला जारकर्माची भीती वाटण्याचे कारण नको; विधवेला पुनर्विवाह न करता संतती होण्याची भीती नको; ब्राह्मणांना शूद्र स्त्रिया करण्याची भीती नको; असा समज कल्पावा लागतो. ते कठीण आहे. क्षत्ता, गोलक, कुंड या जातीही असतील; पण अशा प्रकारे तयार झालेल्या नसतील. नागांची संस्कृती इतिहासाला मान्य आहे. पण मृग, पक्षी, यक्ष, गंधर्व, किन्नर, अप्सरा, ऋषी इ. जाती अस्तित्वात असतील असे मानण्याचे काहीच कारण नाही. पुराणग्रंथांतील जातिवाचक उल्लेखांचा बुद्ध-जैनांतील जातिवाचक उल्लेखांशी सांधा जोडल्याशिवाय कुठलीही जात पाणिनीपूर्वकालात अस्तित्वात होती हे विधान करणे धाडसाचे ठरते.
 अण्णांनी बहुपतित्वाची अनेकविध उदाहरणे दिली आहेत. द्रौपदी-पाच,