पान:अभिवादन (Abhivadan).pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२ । अभिवादन

आहे. ज्यांना आम्ही काव्याचे निकष म्हणतो ते सर्वमान्य नाहीत आणि निकषांची यादी परिपूर्ण नाही. प्रत्येक कवीत व्यक्तिवैशिष्ट्य असते आणि प्रत्येक कवीचा सामग्याने एक परिणाम होत असतो व हा समग्र परिणाम घटकांच्या परिणामांच्या बेरजेपेक्षा वेगळा असतो; हे जर आपण मान्य करणार असू तर नांदापूरकरांनी केलेल्या चौफेर तौलनिक अभ्यासानंतरसुद्धा मुक्तेश्वर आणि मोरोपंत यांच्या वाङमयीन महत्तेचा निर्णय अजूनही रसिकसापेक्षच उरला आहे हे नाकारता येत नाही. मोरोपंतांसारख्या एका महाकवीचा सततचा होणारा अधिक्षेप अण्णांना अशा प्रकारच्या तुलनेला प्रवृत्त करता झालेला असावा. या तौलनिक अभ्यासाने, मोरोपंत हाही फार मोठा कवी आहे; तो नुसताच यमकानुप्रासाचे खेळ करणारा भाषांतच्या नसून रस, स्वभावरेखन, कथानकरचना यांतही आपली वैशिष्टयपूर्ण महत्ता दाखविणारा कवी आहे, इतके जरी सर्वमान्य होऊ शकले तरी या प्रबंधाचे कार्य निम्मे यशस्वी झाले, असे म्हणावयास हरकत नाही. आणि या प्रबंधाने मराठीच्या महाकवीत पंतांची महनीय अढळ जागा निर्माण करून फार मोठे ऐतिहासिक कार्य साधले आहे हे नाकारता येणार नाही.
 अण्णांना आपल्या प्रबंधात सर्व बाजूनी विचार करण्याचा फार मोठा हव्यास जडलेला दिसतो. या हव्यासापायी त्यांनी तीन परिपूर्ण प्रबंध आपल्या प्रबंधातं एकत्र आणले आहेत : कथानक, व्यक्तिरेखा आणि शैली या निकषांवर व्यास-मुक्तमयूर यांची तुलना करणारा एक परिपूर्ण भाग; रसवत्ता, अलंकार, औचित्य हा विचार करणारा दुसरा परिपूर्ण भाग; व कवींची भूमिका, त्यांचे स्वातंत्र्य, त्यांचे संक्षेपविस्ताराचे धोरण, त्यांच्या काव्यांतून दिसणारी सामाजिक परिस्थिती, मुक्तेश्वरी प्रमाणप्रतीची आवश्यकता, मुक्तेश्वरावर झालेला जनाबाईचा परिणाम इ. अनेकविध प्रश्नांचा विचार करणारा तिसरा संकीर्ण भाग. यांतील प्रत्येक विभाग त्यात आलेल्या प्रश्नांच्या चर्चेपुरता परिपूर्ण आहे. अण्णांचा सर्वांगीण अभ्यास, त्यांची चौफेर टीकादृष्टी यामुळे सर्वमान्य जरी झाली तरी यामुळेच प्रबंधाची एकात्मता उणावली आहे असे कुणी म्हटले तर (मला वाईट वाटेल हे जरी खरे असले तरी) हा आक्षेप मला खोडता येणार नाही. एखाद्या काव्याला रसाची कसोटी लावतानाच स्वभावरेखनाची कसोटी लावावी काय, हाही असाच वादग्रस्त प्रश्न आहे. ज्या काव्याला रसांची कसोटी लावली जाते, त्या काव्याचे तुकडे करणे अपरिहार्य असते. काव्यप्रबंधभर इतस्ततः विखुरलेले समान रसांचे प्रसंग एकत्र करून तो तो रस त्या त्या ठिकाणी कवीने कसकसा रंगविला आहे याची चर्चा करावी लागते. व्यक्तिरेखनाच्या कसोटीत तो तो काव्यप्रबंध सलग घ्यावा लागतो. यामुळे काव्याचे मूल्यमापन उभे आणि आडवे तुकडे करून करीत असतानाच समग्र काव्यकृती एकात्मही गृहीत धरावी लागते. त्यामुळे थोडासा दुरवस्था प्रसंग ओढ