पान:अभिवादन (Abhivadan).pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


प्राचार्य अनंत सदाशिव आठवले । १०९


"सूत' हे कनिष्ठ जातीय होते असे अज्ञान त्याच्या बुडाशी आहे. अनंतरावांचे कर्णाविषयीचे लिखाण हे मला त्यांच्या आवडत्या लिखाणापैकी आहे. कर्णावर डॉ. वाळिंबे आणि दाजी पणशीकर ह्यांनीसुद्धा लिहिले आहे. पण काहीजण ज्याप्रमाणे कर्णाची खरी खोटी भलावण ही आपली जबाबदारी मानतात त्याचप्रमाणे काही मंडळींना कर्ण जणू आपला शत्रू आहे असे समजून लढणे ही आपली जबाबदारी आहे असे वाटते. असा कोणताही अभिनिवेश न ठेवता कीवर मार्मिकपणे लिहिता येते ह्याचा फार चांगला नमुना म्हणजे अनंतरावांचे कर्णावरील लेखन होय.
 महाभारताची ऐतिहासिक चिकित्सा हा आठवले यांचा विषय नाही. आणि ऐतिहासिक चिकित्सा करणे हा त्यांचा पिंडही नाही. पण महाभारत हा आपल्या संस्कृतीने शतकानुशतके पूज्य मानलेला ग्रंथ आहे. गुप्तांच्या काळापासून म्हणजे सुमारे दीड हजार वर्षांपासून भारताविषयीची पूज्यबुद्धी सातत्याने चालत आलेली आहे. तोंडाने जरी महाभारत हा इतिहास आहे असे आपण मानत आलो तरी व्यवहारात तो परमपूज्य धर्मग्रंथ आहे. ह्या अनुरोधानेच ह्या धर्मग्रंथाची प्रतिष्ठा चालत आली आहे. म्हणून महाभारताचे महत्त्व नुसते ऐतिहासिक नाही, तर ते सांस्कृतिकही आहे. सांस्कृतिक अभ्यासांचा हा एक भारतीयांचा महान राष्ट्रीय ग्रंथ आहे. अनंतरावांच्या महाभारतावरील लेखनाचे महत्त्व महाभारताच्या सांस्कृतिक अभ्यासाच्या दृष्टीने आहे.
 आपली अडचण अशी आहे की, आधुनिक मंडळींना चिकित्सा म्हटल्याबरोबर फक्त ऐतिहासिक चिकित्सा लक्षात येते. ऐतिहासिक चिकित्सा हा चिकित्सेचा एक प्रकार आहे, पण त्याखेरीज एक सांस्कृतिक चिकित्साही असते. अभ्यासाची तीही एक पद्धत आहे आणि तिलाही महत्त्व आहे. आधुनिक मंडळींना हा मुद्दा सांगितल्याशिवाय हे समजत नाही आणिं सांगूनसुद्धा पटेलचं असे नाही. या उलट जे धर्मपरंपरावादी आहेत, त्यांना सांस्कृतिक अभ्याससुद्धा एक प्रकारची चिकित्सा असतो आणि अशी चिकित्सा भाबड्या अंधश्रद्धेच्या विरोधी जात असते हा मुद्दा नीटसा ध्यानात येत नाही. आठवले यांचा महाभारताचा अभ्यास जरी आपण डोळ्यांसमोर ठेवला तरीही अडचण उपस्थित होणार आहेच. ज्याला आपण खऱ्या अर्थाने दानशूर म्हणतो, त्या गटात कर्णाचा समावेश होणार नाही. कर्ण हादानशूर झालेला आहे तो अर्जुनाच्या पराभवासाठी. त्यासाठी त्याने आसुरी तपाचा आरंभ केला आहे. म्हणून ही गोष्ट परंपरा मानणाऱ्यांनाही खटकणारी आहेचः महाभारतातील कर्णाच्या व्यक्तिमत्त्वात जर खरा दानशूरपणा नसला आणि काही अहंता, काही प्रमाणात आसुरी तप हीच कर्णाच्या स्वभावाची वैशिष्टये असतील तर कर्ण म्हणजे दातृत्वाचा आदर्श ही कल्पना आली कुठून हा प्रश्न निर्माण होतो. आपण कवचकुंडलांचे दान केले, असे कर्ण म्हणतो, पण प्रत्यक्ष महाभारतात मात्र कवचः