पान:अभिवादन (Abhivadan).pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१० । अभिवादन

सहा वर्षे लागली. १९४६ साली हा प्रबंध दोन हजार पानांच्या वर होता. तो संक्षिप्त करून टंकलिखित करणे सुरू झाले. मूळ लेखकाने टंकलेखन येत नसताना केवळ दोन बोटांनी टाईप केलेला हा जगातील पहिलाच प्रवंध असावा. अण्णांना त्याआधी अगर नंतर टंकलेखन करताना आम्ही पाहिले नाही. अण्णांच्या बारीक अक्षरात लिहिलेले एक पान टंकलिखित एका पानाच्या जवळजवळ दीडपट असे. संक्षिप्त करून बाराशे पानांची टंकलिखित प्रत त्यांनी तयार केली. हे कार्य चालू असताना सुमारे दीड वर्ष अण्णांना सांगणारा लागे. ते कार्य करता करता आम्ही सर्वजण अगदी रडकुंडीला आलो होतो. शेवटी एकदाचा हा प्रबंध संपला. पण परीक्षकांनीसुद्धा अण्णांचा सूड घेतला. त्यांनी निकाल देण्यास पुरे दीड वर्ष लावले आणि अखेर अण्णा ' डॉक्टर' झाले. ते कॉलेजला असताना त्यांनी संकल्पिलेले हे कार्य संपवून मोकळे होण्यास त्यांना वावीस वर्षे लागली. सबंध जीवनच जणू या प्रवंधाने शोपून टाकले होते. आयुप्यभर खपून तयार केलेला हा ग्रंथ प्रकाशात कसा येईल याचीही चिंता त्यांना पोखरीत होती. वैतागाने पुष्कळदा हा प्रबंध जाळून टाकावा, असे मी त्यांना सुचविले होते. अण्णा रसिक होते. अंत:करणाचे कवी होते. कौटुंबिक जीवनात त्यांना रस होता. पण या प्रबंधाने त्यांना खिळे मारून आयुष्यभर जखडून ठेवले. ते जर दहा-पंधरा वर्षे आधी पीएच्. डी. होते तर निदान आर्थिक सुस्थितीत त्यांचे जीवन गेले असते. पण यशाचा प्याला त्यांच्या हाती फार उशिरा आला.
 आजचा छापील ग्रंथ त्यांच्या टंकलिखित प्रतीचा पुन्हा संक्षेप आहे. याही अवस्थेत तो ७५० पानांचा आहे. मुद्दे आणि मुद्दे यांनीच तो भरलेला आहे. अण्णा रसाळ शैलीचे लेखक होते. आपली सर्व शैली त्यांना छापील ग्रंथातून काढून टाकावी लागली. संक्षेपविस्तार आणि भाषांतरे यांची परिशिष्टे जर घेतली असती तर अजून १०० पाने वाढली असती. त्यामुळे तीही गाळून टाकली आहेत. विषयाचा पसारा एवढा मोठा आहे की, ७५० पानांत त्यांना फक्त संक्षिप्त टाचणवजा लिखाण करावे लागले. ते बी. ए. ला असताना मुक्तेश्वर आणि मोरोपंत हे उभय कवी त्यांना अभ्यासावे लागले. सामान्यतः मराठी साहित्य समीक्षकांनी मुक्तेश्वराला महाकवी म्हणून एकमताने मान्य केले आहे. पण मोरोपंतांची स्थिती तशी नाही. केवळ भाषांतरकार इतकेच त्यांचे महत्त्व मानणारे समीक्षक त्याही वेळी होते, आजही आहेत. मोरोपंतांच्याविषयी अतिशय प्रेम असणारे समीक्षकसुद्धा मुक्तेश्वर हा कवी म्हणून मोरोपंतांपेक्षा श्रेष्ठ आहे हे गृहीतच धरीत होते. अण्णांचा या सर्व भूमिकेला मूलत: विरोध होता. मुक्तेश्वर आणि मोरोपंत यांची काव्यनिकषांवर तुलना करून 'मुक्त-मयूर' श्रेष्ठ-कनिष्ठत्वाचा प्रश्न धसाला लावावा असा विचार त्यांच्या डोक्यात मूळ धरू लागला. एम. ए. च्या निमित्ताने ते नाग