पान:अभिवादन (Abhivadan).pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


श्री. ग. त्र्यं. माडखोलकर । ९९


लेखक उदयाला आल्यापासून वीस वर्षांत मावळू लागला, त्याचा वैभवकाळ तर फक्त अठरा वर्षांचा आहे, हे माडखोलकर गुरुभक्तीच्या भरात विसरतात. इतर लेखक सोडा, स्वतः माडखोलकर यापेक्षा दीर्घ काळ सर्व विरोधकांना पुरून उरलेले आहेत आणि वाचकांच्या मनात ठाण मांडून बसलेले आहेत. इतकेही यश आपला वाचक टिकवण्यात त्यांच्या गुरुजींना आलेले दिसत नाही.
 एखाद्या लेखकाने आपला वाचकवर्ग टिकवणे म्हणजे सर्वस्व नव्हे. ते वाडमयाच्या क्षेत्रातील त्या लेखकाच्या मोठेपणाचे गमक नव्हे, तसे कलात्मकतेचेही गमक नव्हे. या सर्व गोष्टी मान्य केल्या, तरी इतक्या वेगाने एखादा लेखक मागे का पडतो हे विचारात घेतलेच पाहिजे. कवी, कादंबरीकार, कथाकार या नात्याने कोल्हटकरांना किमान यशही आले नव्हते. त्यांचे मोठेपण वाङमयसमीक्षा, विनोद आणि नाटक या क्षेत्रांत आहे. विशेषतः नाटकाच्या क्षेत्रात त्यांच्या मोठेपणाचे स्वरूप नवीन कल्पकतापूर्ण कथानक, कल्पनाप्रचुर कोटिनिष्ठ संवाद, विनोदाला स्वतंत्र जागा, नवे संगीत अशा प्रकारचे आहे. कोल्हटकर जिवंत नाटयगुणांसाठी कधी प्रसिद्ध नव्हते. त्यांच्या प्रभावामुळे मराठी नाट्यसृष्टी बदलली. पण त्यांचे स्वतःचे नाटक मात्र कधीही टिकाव धरू शकले नाही. याचे कारण असे की, एखादा नाटककार कल्पनाविलासाच्या जोरावर वाङमयाचा भावनात्मक परिणाम वाढवतो. एखाद्याच्या जवळ अशी कोणती उत्कटता नसतेच, जिवंतपणाही नसतो. फक्त कल्पना व कोट्या असतात. ज्या दिवशी कल्पनाप्रचुर संवाद लिहिणारा नवा नाटककार उदयाला येतो आणि त्याच्याजवळ उत्कटतेचा अंशही असतो, त्या दिवशी नुसते कोटया करणारे मागे पडतात, हे कोल्हटकरांचे झाले. कोल्हटकरांना बाधक ठरले असतील तर गडकरी आणि खाडिलकर हे दोन नाटककार बाधक ठरले. माडखोलकर सांगतात त्याप्रमाणे वाचक-प्रेक्षकांचा दर्जा खालावला, हे बाधक ठरले नाही. इ. स. १९२० नंतर खाडिलकर, गडकरी, खांडेकर, माडखोलकर, अत्रे, वरेरकर हे क्रमाने लोकप्रिय होत गेले आणि त्या शेजारी मागची देवल, किर्लोस्करांची नाटकेही लोकप्रिय राहिलीच. फक्त मधले कोल्हटकर मात्र अस्त पावले. याची जबाबदारी वाचक-प्रेक्षकांच्यावर टाकणे अन्यायाचे आहे.
 कोल्हटकरांच्या संगीताविषयी सुद्धा एकदा स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. किर्लोस्करांच्या नाटकांतून जे संगीत क्रमाने मराठी रंगभूमीवर प्रतिष्ठित झाले, त्यात एक स्थित्यंतर होते. भजन, लावण्यांचे संगीत या रंगभूमीवरील प्रयोगांतून से मोठ्या वेगाने बदलत गेले आणि त्या ठिकाणी ग्वाल्हेर गायकीचे संगीत क्रमाने लोकप्रिय झाले. किर्लोस्कर- देवलांच्या लाटकात ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीला शक्य तितके सुगम आणि आकर्षक स्वरूप देण्यात येत होते. यानंतर खाडिलकर पुढे आले. खाडिलकरांच्या नाटकांच्या मधून कधी जयपूर घराणे, कधी जयपूर