पान:अभिवादन (Abhivadan).pdf/10

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


'मुक्त-मयूरांची भारते'


कै. डॉ. नारायण गोविंद नांदापूरकर यांच्या प्रबंधाचा परिचय मी करून द्यावा असे सुचविण्यात आले आहे. मराठवाड्यातील चिकित्सक साहित्यात गेल्या एक शतकात एवढा महत्त्वाचा ग्रंथ झाला नाही आणि संपूर्ण महाराष्ट्राचा विचार जरी केला तरी मराठी भाषेत दोन महाकवींची विस्तृत व सांगोपांग तौलनिक चर्चा या ग्रंथाने प्रथमच उपलब्ध होत आहे. व्यासांचे मूळ महाभारत, मुक्तेश्वरांचे त्यावरील काव्य आणि मोरोपंतांचे 'आर्याभारत' या तीन बृहत्ग्रंथांचा प्रचंड तौलनिक अभ्यास या प्रबंधात सादर करण्यात आला आहे. मराठी भाषेला दीर्घकाळपर्यंत अभिमानास्पद वाटावा असा हा ग्रंथ माझ्यासारख्याने त्याचा परिचय करून देण्याचे धाडस करावे हा मर्यादेचा अतिक्रम म्हटला पाहिजे. एका दृष्टीने पाहिले तर मी या प्रबंधाचा परिचय करून देण्यात औचित्यही आहे. नांदापूरकरांच्या अधिकृत शिष्यप्रशिष्यांना जर राग येणार नसेल तर या प्रबंधाचा पहिला वाचक मी आहे. असे म्हणण्याचे धाडस करण्यास हरकत

नाही. कै. नांदापूरकर हे माझे सर्वांत वडील मामा. वयाच्या ९ व्या वर्षापासुन हा प्रबंध पीएच्.डी.साठी मान्य होईपर्यंतचा काळ मी त्यांच्याच घरी काढला. १९४० साली मी जेव्हा त्यांच्याकडे राहावयास गेलो त्या वेळी अण्णांचा अभ्यास जवळजवळ संपत आलेला होता. टिपणांचे ढीग समोर ठेवून आमचे अण्णा प्रकरणवार टाचणे काढीत होते. त्या वेळेपासून १९४६ सालपर्यंत हा प्रबंध नुसता लिहिला जात होता आणि अण्णा लिहू लागले म्हणजे बाजूला वसून मी तो वाचून टाकीत असे. अण्णांची चिकाटी फारच जवरदस्त होती. त्यांना चकाटया पिटीत असताना मी फारसे पाहिले नाही. कॉलेजचा वेळ सोडला तर ते सारखे लिहीतच असत. आम्ही घरची मंडळी जो अडथळा आणू तितक्यापुरता अगर कुणी भेटावयास आले तर त्यापुरता ते दम खात. रोजी वीस-बावीस पाने तरी लिहीत. लिहिलेला भाग पुन:पुन्हा तपासीत. त्यावरून दुसरी प्रत तयार करीत. येवढा वेग आणि चिकाटी असूनही त्यांना प्रवंध लिहून काढण्यास