________________
ट्रान्सफॉर्मर - प्रवाह किंवा विद्युत दाब कमी - जास्त करण्यासाठी ज्या साधनांचा उपयोग वेल्डींग कामात करतात त्यास ट्रान्सफॉर्मर म्हणतात, ट्रान्सफॉर्मर हा म्युच्युअल इंडक्शनच्या (Mutual Induction) सिद्धांतावर आधारित आहे. ट्रान्सफॉर्मरला रोहित्र असेही म्हणतात
.
वेल्डींगसाठी वापरीत असलेले ट्रान्सफॉर्मर, एअर कूल्ड (हवेने थंड होणारे) किंवा ऑईल कूल्ड (तेलाने थंड होणारे) असतात. एअर कूल्ड ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉईलच्या आत नैसर्गिकरित्या किंवा विजेच्या लहान पंख्या (फॅन) द्वारे हवा सोडली जाते. ऑईल कूल्ड मशीनमध्ये संपूर्ण ट्रान्सफॉर्मर ऑईलमध्ये बुडविलेला असतो.
आर्क वेल्डींगसाठी AC (अल्टर्नेटिंग करंट) प्रवाह सर्वसाधारणतः ८० ते १०० व्होल्ट दाब असतो. परंतु विजेच्या मुख्य (Main) प्रवाहाचा दाब ४४० व्होल्ट असतो. ४४० व्होल्ट दाब असताना वेल्डींग करता येणार नाही, म्हणून तो दाब कमी करण्यासाठीच या ट्रान्सफॉर्मरचा वेल्डींगसाठी उपयोग करावा लागतो.
(२) वेल्डींग जनरेटर : (Welding Generator) जनरेटरने यांत्रिक शक्तीचे विद्युतशक्तीत रूपांतर केले जाते. जनरेटरला मराठीत 'जनित्र' म्हणतात. आर्क वेल्डींग करण्यासाठी आवश्यक असलेला डायरेक्ट करंट (DC)मिळविण्यासाठी DC जनरेटरचा उपयोग करतात. या जनरेटरला (AC किंवा DC) मोटारने फिरविले जाते. वेल्डींग करण्यासाठी साधारणत: AC मोटारने चालणारा जनरेटर सेट वापरतात.
(३) वेल्डींग रिअॅस्टर : याचा वापर (AC) (आल्टर्नेटिंग) करंटचे (DC)(डायरेक्ट करंट) मध्ये रुपांतर करण्यासाठी करतात.
सुरक्षितता : शॉपमध्ये काम करण्याअगोदर प्रत्येक वेल्डरला त्या शॉपमधील सुरक्षिततेच्या दक्षता व त्याचे नियम माहीत असणे आवश्यक आहे. वेल्डींगसाठी वापरत असलेल्या मशीन व इतर साधने तसेच वेल्डींग तंत्राचे पुरेसे ज्ञान असावयास पाहिजे. आगीपासून संरक्षण व आग लागू नये यासाठी घ्यावी लागणारी दक्षता याकडे विशेष लक्ष दिल्यास अपघात होण्यास प्रतिबंध होतो. कामासाठी दिलेली साधने काळजीपूर्वक न वापरल्यास अपघात होण्याचा संभव असतो.
खालील सुरक्षिततेच्या दक्षता लक्षपूर्वक ऐकणे व त्यांचे पालन करणे :
(१) वेल्डींग ट्रेडसाठी दिल्या गेलेल्या औपचारिक सूचना.
(२) इन्स्ट्रक्टरकडून दिल्या जाणाऱ्या सूचना.
(३) जॉब करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या सूचना.
(४) विभागातील दक्षता फलकांवरील सूचना.
खालील गोष्टींमुळे अपघात होतात:
(१) वेल्डर थकलेला किंवा कंटाळलेला असणे.
(२) कामावरील लक्ष विचलित होणे.
(३) चुकीचा अंदाज (Wrong Judgement) करणे.
(४) शॉपमध्ये टिंगल-टवाळी, माकडचेष्टा करणे.
(५) कारागिरांमध्ये सामंजस्य नसणे.
पुढील गोष्टीसुद्धा अपघातास कारणीभूत ठरू शकतात :
(१) कारागिरास चुकीच्या सूचना दिल्याने.
(२) योग्य मार्गदर्शन नसणे.
(३) कामाची जागा अडगळीची असणे.
(४) वापरावयाच्या साधनांची योग्य काळजी न घेणे,
(५) पुरेसा प्रकाश नसणे.
आर्क वेल्डींग करताना पाळावयाच्या सुरक्षा दक्षता :
(१) वेल्डींगची मशीन्स (ट्रान्सफॉर्मर, जनरेटर) चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी.
(२) इलेक्ट्रिक केबल आणि इलेक्ट्रोड होल्डरची तपासणी करून घ्यावी.
(३) वेल्डींग करण्याअगोदर ग्लोव्हज, अॅप्रन, चामडी बूट इत्यादी घातलेले असावेत.