________________
(१) पोर्टेबल ड्रिलिंग मशीन/हँड ड्रिलिंग मशीन (सुसह्य वेधन यंत्र) : हे यंत्र कुठेही नेऊन हाताचा आधार देऊन छिद्र पाडता येते म्हणून याला पोर्टेबल/ हॅन्ड ड्रिल मशीन असे म्हणतात. जोडारी विभागात वापरले जाणारे हँड ड्रिल मशीन विद्युत शक्तीवर फिरविले जाते. ० ते ६ मि.मी. व्यासाची छिद्र पाडण्यासाठी याचा उपयोग होतो. यात सरळ दांड्याचे ड्रिलचक मध्ये बसवून छिद्र पाडतात. तसेच याच्या मुठीवर यंत्र चालू बंद करण्यासाठी बटण असते. सर्वसामान्य लहान व कमी खोलीच्या छिद्रासाठी याचा उपयोग होतो.
(२) सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीन (संवेदी वेधन यंत्र) : सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीनचे दोन प्रकार आहेत. (अ) बेंचटाईप ड्रिलिंग मशीन (मेज वेधन यंत्र) (ब) पीलर टाईप ड्रिलिंग मशीन (स्तंभ वेधन यंत्र)
विशेष माहिती : आकृतीत दाखविल्याप्रमाणे या मशीनची रचना असते. छोटे ड्रिलमशीन बेंच किंवा वर्कीग टेबलावर बसविलेले असते. इलेक्ट्रिकल मोटारच्या साहाय्याने छिद्र पात्याला वेग दिला जातो. वेगवेगळे स्पीड वापरण्यासाठी स्टेप पुलीची (Step Cone Pully) रचना यात केलेली असते. १० ते १२ मि.मी. चे छिद्र पाडण्यासाठी या यंत्राचा उपयोग होतो. स्तंभावर वर्कीग टेबलवर 'वेधन पटल' बसविलेले असते. क्षितिज समांतर जॉब ठेऊन छिद्र पाडले जाते. जर कोनात छिद्र पाडावयाचे असल्यास टेबलचा कोन बदलण्याची व्यवस्था यात असते. तसेच तो खाली-वर सरकवता येतो. ड्रिलचक (Drillchuck) मध्ये ड्रिल पकडून छिद्र पाडले जाते. सर्वसामान्य वापरासाठी याचा उपयोग होतो. ड्रिलचक मध्ये ड्रिलबिट बदलून
लहान-मोठी छिद्रे करता येतात.
वेल्डींग मशीन (Welding Machine)
वेल्डींग मशिनचे दोन प्रकार आहेत
(१) अल्टर्नेटिंग करंट मशिन (AC)
(२) डायरेक्ट करंट मशिन (DC)
ट्रान्सफार्मर
डि.सी.जनरेटर
स्टेप अप ट्रान्सफार्मर स्टेप डाउन ट्रान्सफार्मर
रेक्टीफायर (रिअॅक्टर)