Jump to content

पान:अभियांत्रिकी.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अभियांत्रिकी इयत्ता : ८ वी दिवस : पहिला प्रात्यक्षिकाचे नाव : साहित्य, साधनांची ओळख व मापन, सुरक्षिततेचे नियम उद्देश : (१) अभियांत्रिकी विभागातील मशिनरी, साधने व साहित्याची ओळख करून देणे. (२) अभियांत्रिकी विभागातील मशिनरीवर काम करताना कोणती सुरक्षितता बाळगायची ते सांगणे. (३) मापन : विद्यार्थ्यांना टेप, मोजपट्टी इत्यादी साहित्याचा वापर करून वर्ग, दरवाजा, खिडकी, फळा, टेबल आदींचे लांबी, रुंदीचे मापन करायला शिकविणे. पूर्व तयारी : मापन साधने टेबलवर एकत्र ठेवणे. उदा.व्हर्निअर इ., मोजपट्टी, मीटर टेप, एक मीटर लांबीची स्टील पट्टी, स्प्रिंग बॅलन्स (१ ते १०० कि.ग्रॅ.) मापना संदर्भातील उपक्रम : (१) अभियांत्रिकी विभागातील खोलीची लांबी व रुंदी मोजणे. (२) टेबलाची मापे घेणे. (३) व्हर्निअरने बारचा व्यास मोजणे. (४) वस्तुचे वजन करणे. (स्प्रिंग बॅलन्सचा उपयोग करणे.) (५) अँगल, बार यांची साईज मोजणे. (६) मापे घेताना इंच, फूट व सें.मी. मध्ये मोजून दाखवावी. (७) त्या त्या साधनांचा लिस्ट काऊंट (लहानात लहान माप) समजून देणे. अपेक्षित कौशल्ये : (१) जॉबची मापे घेता येणे. (२)साधनांचा वापर करणे. उदा.व्हर्निअर कैवार, मीटर टेप इ. (३) मोजमापामध्ये एककांचे रूपांतर करणे. (४) हत्यारे, साधने व मशीन ओळखता येणे. शिक्षक कृती: (१) सुरुवातीला सुरक्षिततेचे नियम समजावून सांगा. (२) सुरक्षितता नियमांचे तक्ते मुलांकडून भिंतीवर घ्यावे. (३) वर्कशॉपमध्ये वापरण्यात येणारी नविन हत्यारे व साधने यांची ओळख करून घ्यावी. त्यांचे कार्य व उपयोग समजावून सांगा. उदा. ड्रिलिंग मशीन (४) मुलांना लाकडाला होल मारून दाखवा. (५) शेअरींग मशीनने लोखंड कापून दाखवा. (६) वेल्डींग मशिनने वेल्डींग करून दाखवा. (७) ग्राईंडींग मशीनने ग्राईंडींग करुन दाखवा. (८) मोजमाप कसे करावे किंवाघ्यावे ते शिकवा. (९) एककांचे रूपांतर करायला शिकवा. (उदा. लोखंड मोजणे, खोलीची लांबी, रुंदी) (१०) मापन पद्धती समजावून द्या. प्रात्यक्षिकाचे नाव : वर्कशॉप विभागातील साहित्य, साधने व मशिनरीची ओळख करून घेणे व सुरक्षितता. वर्कशॉप विभागात काम करताना आपणास अनेक साहित्य साधने तसेच मशिनरीचा वापर करावा लागतो. प्रथम याविभागातील साहित्य व साधनांची माहिती करून घेवूयात. वेल्डींग हॅन्ड स्किन ल्डींग होल्डर