________________
फिटिंगकरिता खिळे व स्क्रू यांचा उपयोग करतात. (ब) कोपऱ्याचा खापीचा सांधा (Corner Lap Joints): हा सांधा चौकटी सांध्याच्या प्रकारातील आहे. याचा उपयोग चौकटी व फर्निचर कामामध्ये करतात. कोपऱ्यावर जोड देण्याकरिता उपयोग होतो. (क) क्रॉस लॅप जॉईंटस् (Cross Lap Joints) (बंद खापीचा सांधा): हा सांधा चौकटी सांध्याच्या प्रकारात मोडतो. ज्या ठिकाणी दोन पट्ट्या एकमेकांस काटकोनात मिळत असतील, अशा ठिकाणी याचा उपयोग करतात. याचे फिटिंग स्क्रू किंवा खिळ्याने करतात. (ड) अर्ध उघड्या खापीचे सांधे (Half Lap Joints) (टी लॅप जॉईंट) : अगदी सामान्य कामात हा सांधा वापरतात. याचे फिटिंग खिळे किंवा स्क्रूने करतात. (२) टेनन अँड मॉर्टिस जॉईंट (Tenon and Mortis Joint) : सर्वसाधारणपणे फ्रेमिंग जॉईटमध्ये टेनन व मॉर्टिस जॉईट जास्त प्रमाणात वापरला जातो. यामध्ये दोन पीस असतात. एकाला टेनन अथवा गाँज असे म्हणतात व दुसऱ्याला मॉर्टिस अथवा छिद्र असे म्हणतात. टेननची जाडी लाकडाच्या जाडीच्या भाग असते व ती मॉर्टिसमध्ये काटकोनात बसवितात. मूल्यमापन : (१) सुतारकामात उपयोगात येणारी साधने सांगा. (२) स्पॅनर्सवप्लायर्सचे विविध प्रकार सांगा. (३) टीपा लिहा : अ) कानस, ब) स्क्रू ड्रायव्हर क) अंबूर ड) शिंकजा घटक : लाकूड व त्यासंबंधी माहिती उद्दिष्टे : (१) झाडाची उत्पत्ती व प्रकार (२) सुतारकामात उपयोगात येणारे विविध प्रकारचे लाकूड (३) कृत्रिम लाकूड (४) लाकडाचे संरक्षण उपघटक (१): झाडाची उत्पत्ती व प्रकार. प्रस्तावना : झाडे ही नैसर्गिक संपत्ती आहे. अनादी काळापासून ही संपत्ती माणसाला उपलब्ध होत आहे. झाडापासून मानवास अनेक फायदे आहेत. त्यांच्यापासून अनेक जीवनावश्यक वस्तू प्राप्त होतात. त्यापैकी सुतारकामात वापरण्यात येणारे लाकूड हे झाडाचे खोड होय. बी रूजल्यानंतर झाड तयार होते. झाडाची वाढ टप्प्याटप्प्याने होते. झाडाचे प्रकार : झाडांच्या वाढीच्या पद्धतीवरून झाडाचे खालील मुख्य प्रकार आहेत. (१) आंतर वाढीची झाडे : या प्रकारात झाडाची वाढ आतील बाजूने होते. म्हणून यास आंतरवाढीचे झाड असे म्हणतात. उदा. बांबू, ताड, सुपारी, नारळ इत्यादी. (२) बाहेरील वाढीची झाडे: या झाडाची वाढ बाह्य बाजूने होते. म्हणून या झाडांना बाहेरील वाढीचे झाड असे म्हणतात. उदा. सागवान, बिजा, देवदार, आंबा, चिंच, बाभूळ इत्यादी. सुतारकामात याच झाडांच्या लाकडाचा उपयोग केला जातो. मूल्यमापन :(१) झाडाचे मुख्य दोन प्रकार सांगा. (२) झाडाची उत्पत्ती कशा प्रकारे होते ते सांगा. उपघटक (२): सुतारकामात उपयोगात येणारे विविध प्रकारचे लाकूड. प्रस्तावना : लाकडाचा दर्जा व गुणधर्मावरून लाकडाचे दोन प्रकार आहेत. १) मऊ लाकूड (Soft Wood), २) कठीण लाकूड (Hardwood) सुतारकामात उपयोगात येणारी लाकडे खालीलप्रमाणे : (१) साग : गुणधर्म : दाट, सरळ व सुंदर सळांचे, पिवळसर सोनेरी/तपकिरी रंगाचे कामास सोपे व टिकाऊ. उपयोग : उत्तम प्रकारचे फर्निचर, इमारत बांधकाम, आगगाडीचे डबे, जहाजे, पॅटर्न इ. तयार करण्यासाठी. (२) शिसम : गुणधर्म : दाट सळांचे, टणक, टिकाऊव वजनदार, जांभळट तपकिरी रंगाचे, उपयोग : रंध्याचे खोड, हत्यारांच्या मुठी व दांडे, किंमती फर्निचर, होड्यांचे सांगाडे इ. तयार करण्यासाठी. ४७