________________
दिवस : तिसरा प्रात्यक्षिक : सुतारकाम-लाकडाचे सांधे (एल.टी.) करणे, स्विचबोर्ड बनविणे. प्रस्तावना : सुतारकामामध्ये अनेक लाकडे एकमेकांना जोडून लाकडी वस्तू तयार केलेल्या असतात. वस्तुच्या गरजेप्रमाणे रचनेत मजबुती, टिकाऊपणा व सुंदरता यावी याकरिता कराव्या लागणाऱ्या जोडणीस सांधे म्हणतात. या सांध्यांचा उपयोग करून अनेक लाकडी वस्तू बनविल्या जातात. (उदा. लाकडी पेटी, दरवाजे इ.) यासाठी आपण लाकडी सांधे कसे करतात याचा अभ्यास करून माहती घेऊया. निदेशकांनी करावयाची पूर्वतयारी : (१) प्रात्यक्षिकास लागणारे साहित्य एकत्र करणे. (बॅटन पट्ट्या, प्लायवूड, चुका, बिजागरी, फेव्हिकॉल इ.) (२) हत्यारे व्यवस्थित असल्याची खात्री करा. (पटाशी, किकरे, लाकडी रंधा, हातरेडी, करवत, व्हाईस इ.) (३) साहित्य-साधनांच्या उपलब्धतेनुसार विद्यार्थ्यांचे तीन गट तयार करा. (५ विद्यार्थ्यांचा एक गट) (४) साहित्य व साधने टेबलावर मांडून ठेवा. उपक्रमांची निवड ः (१) स्विचबोर्ड तयार करणे. (२) Weather station लाकडी पेटी तयार करणे. (३) पुस्तक ठेवणी तयार करणे, (४) चेरिंग तयार करणे. (५) लाकडी टेबल, खुर्ची तयार करणे, (६) मधुमक्षिकापालन पेटी तयार करणे. (७) सोलर कुकर तयार करणे. (८) लाकडी बेंच तयार करणे. (९) विणकामासाठी चौकोनी फ्रेम तयार करणे. अपेक्षित कौशल्येः (१) लाकूड कापता येणे. (२) हत्यारांचा वापर करता येणे. (३) लाकूड रंधता येणे. (४) खाचा पाडणे. (५) सांधेमोड करता येणे. (६) योग्य मापात जोडणी करता येणे. (७) मापन (एककामध्ये) ज्ञान असणे. (८) गुण्याचा (डायचा) वापर करता येणे. शिक्षक कृती:(१) विद्यार्थ्यांना हत्यारांचा वापर शिकवणे. (उदा. पटाशी, रंधा आणि सुरक्षितता सांगा) (२) मापनानुसार लाकूड कापण्यास शिकवणे. (३) रंधकाम करताना रंधा कसा पकडावा, कसा चालवावा ते दाखवणे. (४)खाच काम शिकवणे. घटक : सुतारकामातील सांधे उद्दिष्टे: (१) सुतारकामातील सांधे, प्रकार व उपयोग, (२) जोडकामासाठी उपयोगात येणारे साहित्य, उपघटक : सुतारकामातील सांधे, प्रकार व उपयोग.. प्रस्तावना : अनेक लाकडे एकमेकांना जोडून लाकडी वस्तू तयार केलेल्या असतात. वस्तुच्या गरजेप्रमाणे रचनेत मजबुती, टिकाऊपणा व सुंदरता यावी याकरिता कराव्या लागणाऱ्या जोडणीस सांधे (Joints) असे म्हणतात. सांध्याच्या उपयोगावरून सांध्याची खालील चार गटात विभागणी केली आहे. अ) लांबी वाढविणारे सांधे (Lengthening Joints) ब) रुंदी वाढविणारे सांधे (Broadening Joints) क) चौकटी सांधे (Framing Joints) ड) कोनी सांधे (Angular Joints) सांध्यांचे प्रकार : सुतारकामात वापरण्यात येणारे मुख्य प्रकारचे सांधे खालीलप्रमाणे : (१) खापीचे सांधे (Lap Joints) : दोन लाकडात त्याच्या जाडीत अर्धी खाच पाडून, ती एकमेकांत बसवून खापीचे सांधे तयार होतात. यात स्क्रू किंवा खिळे वापरावेत. खापीचे सांधे खालीलप्रमाणे: (अ) साधा खापीचा सांधा (Simple Lap Joints) : लाकडाची लांबी वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो. ४६