Jump to content

पान:अभियांत्रिकी.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रात्यक्षिकाचे नाव : वेल्डींग पॅक्टीस (तिवई तयार करणे.) अपेक्षित कौशल्येः (१) धातू तोडणे. (२) टॅकिंग करणे. | आयसोमेट्रीक ड्राईंग असावी. (३) गज सरळ करणे. (४) वेल्डींग करणे, साहित्य : एम.एस.राऊंड बार, इलेक्ट्रोड, रेड ऑक्साईड इ. साधने : स्टील टेप, वेल्डिंग मशीन, वेल्डींग केबल, अर्थिग क्लॅप, इलेक्ट्रोड होल्डर, वेल्डींग गॉगल / स्क्रीन इ. कृती: (१) प्रात्यक्षिकासाठी लागणाऱ्या साधनांची व हत्यारांची माहिती घ्या. (२) लोखंडी गजाचे तुकडे दिलेल्या मापात छिन्नीने तोडून घ्या. (३) तोडलेले गज ठोकून सरळ करा. (४) जॉबचा धातू, जॉबची जाडी आणि वापरत असलेल्या इलेक्ट्रोडची साईज लक्षात घेऊन मशीनचे अँपीअर सेट करा. (५) आकृतीत दाखवल्याप्रमाणे सारख्या मापाचे तीन-तीन गज वेल्ड करून तिवईचा पाय तयार करा. प्रात्यक्षिकाचे नाव : टी-फिलेट सांधा अपेक्षित कौशल्ये :(१) टी सांध्याचे वेल्डींग करणे. (२) फ्लॅट पोझिशन मधील वेल्डींग करण्याचे तंत्र आत्मसात करणे. साहित्य :(१) मृदू पोलादी पट्टी (Mild Steel) - नग २ (२) मृदू पोलादी पट्टी १०० x ५०४६ मि.मी, - नग १ (३) मृदू पोलादी इलेक्ट्रोड रॉड ४ मि.मी. (फ्लक्स आवरणाचे)- नगर साधने : वेल्डींग, ट्रान्सफॉर्मर, अर्थिग क्लॅप, इलेक्ट्रोड होल्डरसह केबल, हँडस्क्रीन. चामडी अॅप्रन व हातमोजे. सांडशी, चिपिंग हॅमर, वायर ब्रश इ. कृती: (१) पट्ट्याचा पृष्ठभाग व कडा घासून काढा. (२) मशीनवर ४ मि.मी. व्यासाच्या इलेक्ट्रोडसाठी ट्रान्सफॉर्मरवर १९० अॅम्पिअर करंट सेट करा. (३) वेल्डींग इलेक्ट्रोड रॉड होल्डरमध्ये आकृतीप्रमाणे धरा. वेल्डींग रॉडला हालचाल न देता स्ट्रिंगर बीडिंग पद्धतीने एका टोकाकडून सुरू करून कॅटर टोकाकडे वेल्डींग पूर्ण करा. (५) इलेक्ट्रोडची टीप आणि बेसमेटल यातील अंतर नॉर्मल आर्क लेंथ इतके वापरून सांधा पूर्ण करा. (६) चिपिंग हॅमरने बीडवरील स्लॅग काढून वायर ब्रशने स्वच्छ करा, दक्षता व काळजी : (१) सांधकामातील साधनांचा योग्य वापर करा. (२) वेल्डींग इलेक्ट्रोडचा चुकीचा कोन वापरल्यास वितळलेले मेटल योग्य ठिकाणी भरले जाणार नाही. कौशल्य संपादनः (१) फ्लॅट पोझिशनमध्ये सांधकाम करण्याचे तंत्र आत्मसात करणे. (२) टी सांधा वेल्डींग करण्याचे कौशल्य आत्मसात करणे, New wweeewwwwwwwwwwwwwsee www OMMER