Jump to content

पान:अभियांत्रिकी.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कोनात वळविता येतो. यात विरुद्ध वेग मिळविण्यासाठी (Reversible Switch) योजना असते. त्यामुळे छिद्र पाते विरुद्ध दिशेत फिरवून बाहेर काढता येते. पिलर टाईप ड्रिल मशीनचा उपयोग अवजड यंत्र भागावर तसेच मोठ्या व्यासाची (२५ मि.मी. पर्यंत) छिद्रे पाडण्यासाठी केला जातो. छिद्रपाते पकडण्यासाठी साधने (Drill Holding Devices) : छिद्र पाडताना ड्रिल मशीनवर ड्रिल ही तंतोतंत आणि घट्ट पकडून ठेवण्यासाठी खालील साधनांचा उपयोग केला जातो. (२) स्लिव्ह व सॉकेट (SleeveChuck) (१) ड्रिल चक (Drill Chuck) : डिल चकमध्ये सरळ दांड्याचे (स्टेट शंक) असलेले ड्रिल पकडले जातात. यासाठी त्याला तीन जबडे असतात. हे जबडे कमी-जास्त उघडझाप होणारे असतात. त्याकरिता चकला पिनियन (दंतचक्र) किंवा नर्लिंग केलेले रिंग बसविलेलेली असते. पिनियनचे जबडे चावीच्या साहाय्याने कमी-जास्त उघडता येतात. याशिवाय बिना चावीचे हाताच्या पकडीने फिरवून जबड़े कमी-जास्त करणारे ड्रिल चक ही उपलब्ध असते. त्याच्या पृष्ठभागावर नर्लिंग (निख्राचन) केलेले असते. (२) स्लिव्ह व सॉकेट (बाही व खोबण) : निमुळत्या दांड्याचे ड्रिल (Taper Shank Drill) पकडण्यासाठी याचा उपयोग होतो. याला पाच प्रकारचे टेपर असतात. एम.टी.१ ते एम.टी.५ पर्यंत त्यांना क्रमांक दिलेले असतात. ड्रिल मशिनवर अनेक वेळा वेगवेगळ्या मापाची ड्रिल बसवून कामे करावी लागतात. ड्रिल मशिनच्या ड्रिल पकडण्याच्या आसदंडावरील (Shaft) व्यवस्थेपेक्षा ड्रिल बीट छोटे असेल तर त्यावर स्लिव्ह वापरून ड्रिल (छिद्र पाते) बसवितात आणि मोठा असेल तर सॉकेट - वापरून ड्रिल (छिद्र पाते) बसविले जाते. ड्रिल बीट त्या साधनात ठेऊन नुसता दाब देऊन ही ड्रिल बीट घट्ट पकडून ठेवली जाते. पण ड्रिल बाहेर काढताना मृदू पोलादांची निमुळती पट्टी वापरली जाते. तिला सरकवणी (Drift) असे म्हणतात. १) प्लेन बारचे वजन काढणे : उदा. 3 mm. त्रिज्याचे असणाऱ्या आणि 1 M उंची असणाऱ्या बारचे वजन खालीलप्रमाणे काढता येते. उत्तर : उपलब्ध माहिती: घनफळ = [* (त्रिज्या)2x उंची = [h = ३.१४ ४९x१००० = २८२६० mms १M= १०००mm वजन = घनफळ x घनता = २८२६०mm x ७.८६ gm/em' २८.२६.cm_ २२२.१२३६gm ७.८६gm/cm २) अँगलचे वजन काढणे: उदा. १Mलांब असणाऱ्या २५mmx २५mmx ३mm. अँगलचे वजन किती? उत्तर : स्पष्टीकरण : दिलेल्या माहितीनुसार या अँगलची प्रत्येक पट्टी २५mmx १०००mm x ३ mm. (रुंदीx लांबी x जाडी) मापाची आहे. १M= 9000mm - तसेच अँगलच्या दोन्ही पट्ट्या समान मापाच्या आहेत. - म्हणून एका पट्टीचे वजन काढल्यास दोन्ही पट्यांचे वजन मिळेल. लोखंडाची घनता = ७.८६ gm/cm' एका पट्टीचे घनफळ = रुंदीxलांबी x जाडी =१०००mm x २५mm.x३mm, = ७५००omm= ७५cm १०M= १cm एका पट्टीचे वजन = घनफळx घनता =७५emix७.८६gm/cm'. = ५८९.५gm .. दोन पट्ट्यांचे वजन = अंगलेचे वजन =५८९.५४२gm= ११७९gm = १.१७९Kgm. ४२