Jump to content

पान:अभियांत्रिकी.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्हर्निअर कैवार पच दार बिन - मुख्या स्केल - कति क्षत्र वेला व्हर्निअर कैवारच्या साहाय्याने आतील माप, बाहेरील माप व खोली मोजता येते. व्हर्निअर कैवार निकेल क्रोमियम पोलादापासून बनवितात. व्हर्निअरच्या साहाय्याने मोजता येणारे जास्तीत जास्त माप १५० मि.मी. ते ३०० मि.मी. असते. व्हर्निअर कैवारच्या दांडीवर मुख्य मापनी असते व सरकत्या जबड्यावर व्हर्निअर मापनी खुणा असतात. दोन्ही मापाच्या फरकावर याचे तत्त्व आधारले आहे. व्हर्निअर कैवारच्या मुख्य मापनीवर मि.मी.च्या समान खुणा केलेल्या असतात व प्रत्येक दहाव्या भागावर सें.मी.च्या १,२,३ अशा खुणा व अंक असतात. प्रत्येक मि.मी.च्या मापाचे समान दोन भाग करणारी (म्हणजे ०.५ मि.मी.) ची खूणही केलेली असते. या मापनावरील १२ मि.मी. इतके अंतर घेऊन त्याच अंतराचे व्हर्निअर मापनीवर २५ समान भाग केलेले असतात आणि व्हर्निअर मापनीच्या प्रत्येक पाचव्या भागावर २५ पर्यंत ०,५,१०,... याप्रमाणे अंक लिहिलेले असतात. जॉब पकडण्याची साधने : ड्रिल मशिनवर जॉब ठेवण्यासाठी वर्क टेबलची व्यवस्था केलेली असते. छिद्र पाडताना जॉबवर कंपन होते. तसेच जॉब इकडे-तिकडे हलू नये म्हणून एका विशिष्ट जागी जॉब वर्क टेबलवर घट्ट पकडून ठेवण्यासाठी पकडण्याची साधने (Work Holding Devices) वापरतात. रिमर्स : ड्रिलिंग करून तयार केलेले छिद्र अचूक व सफाईदार नसते, तसेच छिद्राचा पृष्ठभाग गुळगुळीत नसतो. त्यामुळे अचूक माप व गुळगुळीत पृष्ठभाग बनविण्यासाठी ड्रिलिंग नंतर रिमिंग ऑपरेशन करतात. ही क्रिया हाताने किंवा मशिनने जॉब व्हाईसमध्ये किंवा लेथ मशिनवर पकडून ज्या कटिंग टूलने करतात, त्यास 'रिमर' असे म्हणतात. मनुष्य शक्तीच्या साहाय्याने रिमर वापरून छिद्राचा व्यास बनवितात, त्यास हॅन्डरिमर असे म्हणतात. जे रिमर यंत्राच्या साहाय्याने वापरतात त्यास रिमर असे म्हणतात. छिद्र पाडताना घ्यावयाची काळजी: (१) छिद्र पाडण्याच्या ठिकाणी जॉबवर सेंटर पंचने खूण करून घ्यावी. (२) ड्रिल मशीनवर जॉब (कार्य) पटलावर घट्ट बसवून काम चालू करावे. (३) जॉब करताना धातू व छिद्राच्या आकारानुसार ड्रिल मशीनचा वेग बदलून घ्यावा. (४) ड्रिलला योग्य धार लावून घ्यावी. (५) ड्रिल (छिद्र पाते) मशीनवर घट्ट बसवावे. (६) छिद्र पाडताना कुलंट (शितोदक) वापर करावा. (७) छिद्र पाडताना बाहेर येणारे काप हाताने काढू नयेत, ब्रशचा वापर करावा. (८) छिद्र पूर्ण होत आहे, असे दिसताना ड्रिल खाली-वर करून छिद्र पाडावे. पीलर टाईप ड्रिलिंग मशीन (स्तंभ वेधन यंत्र) : सेन्सिटिव्ह बेंट ड्रिलिंग मशीनचे हे एक विस्तारित स्वरूप आहे. या ड्रिलिंग मशीन जमिनीवर ठेवल्या जातात आणि त्यांना जास्त शक्ती असलेल्या इलेक्ट्रिक मोटारने चालविले जाते. तसेच वेगवेगळे स्पीड छिद्र पात्याला मिळण्यासाठी स्टेप पुलीचा (Step Cone Pully) वापर केला जातो. याच्या स्तंभाची उंची जास्त असल्याने जॉब ठेवण्यासाठी खूप जागा असते. तसेच याचा वीग टेबल विविध ४१