पान:अभियांत्रिकी.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अभियांत्रिकी इयत्ता : ९ वी दिवस : पहिला प्रात्यक्षिक : व्हर्निअरचा उपयोग, लोखंड कापणे, फाईलिंग व ड्रिलिंग करणे. प्रस्तावना : अभियांत्रिकी विभागात काम करताना विविध साधनांचा वापर करून मापन करणे अपेक्षित आहे. व्हर्निअर कैवार, मायक्रोमीटर स्क्रू गेज या साधनांचा वापर छोट्या मापनासाठी करता येतो. आपण व्हर्निअरचा उपयोग या प्रकरणात अभ्यासणार आहोत. पूर्वी लोखंड कापण्यासाठी हत्यारे नव्हती. त्यावेळी छन्नीच्या आकाराचे लोखंड वापरून तुकडे केले जायचे. सध्या आधुनिक युगात अॅटोमॅटिक मशीनवर कमी वेळात लोखंड कापले जाते. हाताने हँड हॅक सॉ चा वापर करून छोट्या वर्कशॉपमध्ये लोखंड कटिंग करताना साधारण एम.एस.लोखंडाचा जास्त वापर केला जातो. उदा. अँगल, लोखंडी बार (६ mm, १२/१८mm), फ्लॅट. लोखंड कटिंग केल्यानंतर जी बार किंवा टोक निघते ते काम करताना धोकादायक असते. कटिंग करताना मापनानुसार कटिंग न झाल्यास जॉब फिटींगमध्ये व्यवस्थित बसत नाही. त्यासाठी फायलिंग करून जॉब फिनिशिंग करणे महत्त्वाचे आहे. फायलिंग केलेला जॉब उत्तम दर्जाचा व आकर्षक दिसतो. टेबल, स्टूल, दरवाजावर लावून फिक्स करताना आतून ड्रील करणे गरजेचे असते. उपक्रमांची / जॉबची निवड : १. पेपरवेट तयार करणे. २. टेबल तयार करणे. ३. स्टूल तयार करणे. ४. चप्पल स्टँड तयार करणे. ५. गोल रिंग बनविण्यासाठी 6mm. चा बार कट करणे. ६. खिडकी, दरवाजाला ड्रिलिंग करून बिजागिरी बसविणे. पूर्वतयारी : (१) निदेशकाने कच्चे मटेरिअल (लोखंडी अँगल अथवा बार) आणून ठेवणे. (२) कटिंग करण्यासाठी वापरण्यात येणारी हत्यारे सुरक्षित / सुव्यस्थित आहेत का ? ते तपासून घेणे. (३) व्हाईस सुस्थितीत /वापरात आहे ना ? ते पहावे. (४) फायलिंगसाठी कच्चे मटेरिअल पुरेसे असणे. विद्यार्थ्यांचे गट करून सर्वांना फायलिंग करायला देता येईल असे पहावे. अपेक्षित कौशल्ये : (१) मापानुसार लोखंड कटिंग करता येणे. (२) लोखंड कटिंग करताना, योग्य साधनांचा वापर करता येणे (हॅक सॉ, कटिंग मशीन इ.) (३) विविध प्रकारच्या फाईलचा वापर करण्याचे कौशल्य मिळविणे. (४) मापनानुसार फाईलिंग /ग्राईंडिंग करण्यास शिकणे. (५) ड्रिल मशीनचा वापर करण्यास शिकणे. (६) ड्रील बीट - मशीनला बसविता येणे. (७) व्हर्निअरचा उपयोग करता येणे. शिक्षक कृती : (१) विद्यार्थ्यांना व्हर्निअर कैवारचा वापर करून अँगलची जाडी मोजण्यास सांगावे. (२) विद्यार्थ्यांचे तीन गट करावेत. (३) पहिला गट व्हर्निअरचा वापर करेल. अँगल, पत्रा इ.चे मापन करेल. (४) दुसरा गट निवड केलेल्या जॉबचे मटेरिअल कटींग करून देईल. (५) तिसरा गट ड्रिल मशीनवर अँगल, फ्लॅटला ड्रिल करेल. (६) शिक्षक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गटात काम करताना सूचना देतील. (७) तिन्ही गट आलटून पालटून तीनही कामे करतील. (१) व्हर्निअर कैवार (Vernier Calliper): पोलादी रूळ व व्हर्निअर कैवारचा वापर सर्वसाधारणपणे मापनांसाठी कार्यशाळेत करतात. परंतु सूक्ष्ममापनासाठी व्हर्निअर कैवारचा वापर केला जातो. व्हर्निअर कैवारच्या साहाय्याने ०.०२ मी.मी. एवढ्या सूक्ष्मतेचे मापन करता येते. ४०