Jump to content

पान:अभियांत्रिकी.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मर्यादित ठेवावे लागते. वर्तुळाकार कमान केल्यानंतर हा दाब समान पसरला जातो म्हणून खांबामधील अंतर थोडे जास्त ठेवता येते. लंबगोलाकार कमानीत हे अंतर आणखी जास्त करून घुमट दगडातून बांधता येते. बांधकामात ज्या वेळी लाकूड व लोखंड याचा उपयोग सुरू झाला तेव्हा सांगाडा ही पद्धत प्रचारात आली. लाकूड आणि लोखंड ताण, दाब चांगला सहन करतात. विटा : मानवाचे पहिले निवासस्थान नैसर्गिक गुहा हेच होते. आपल्या इच्छेप्रमाणे घर बांधण्यास त्याला लाकड, दगड व माती यांचाच उपयोग करावा लागे. दगड, धोंडे फोडून तयार केलेले डबर हे एकावर एक रचून तो भिंत तयार करत असे. नंतर चिखल वापरून मधली पोकळी भरून काढत असे. त्यातून माणसाला विटांची कल्पना सुचली असावी. लाकडाचा उपयोग बहुतेक ठिकाणी छत, दारे व खिडक्या यांच्यासाठीच जास्त प्रमाणात केला जात होता. डबर व तोडी : दगड लाव्हा रसापासून तयार झालेला असतो. लाव्हारसातील घटक थंड होताना स्फटिक रूप घेतात. प्रत्येक घटकाच्या स्फटिकाला विशिष्ट आकार असतो व दगड फोडताना ता स्फटिकांच्या पातळीतच फुटतो. घरासाठी दगड फोडताना अगदी लहान स्फटिक असलेले दगड फोडण्यास कठीण व सरळ न फुटणारे असतात. त्यामुळे दगड फोडणारा माणूस आवाजावरून योग्य असा दगड निवडतो. त्या स्फटिक मध्यम आकाराचे असल्यामुळे एका घावात एक सपाट बाजू असलेले डबर तो पाडू शकतो. हा दगड कॉम्पॅक्ट बेसाल्ट असतो. मातीच्या कच्च्या विटा : चिखल साच्यामध्ये दाबून भेंडा बनवतात. याला लागणारी माती योग्य असावी, म्हणजे त्यात चिकणमाती (०-०.०२ mm. पेक्षा लहान) व वाळू (०.०५-२ mm) यांचे प्रमाण योग्य असावे. चिकणमाती जास्त झाल्यास वाळताना चिरा पडतात व वाळूचे प्रमाण जास्त असल्यास विटा कमजोर होतात. अशा कच्च्या विटा सावलीत हळूहळू वाळवतात. जास्त मजबूत विटा करताना मातीत अगोदर कापलेले गवत टाकून चिखल करतात व ते १०-१५ दिवस कुजवतात, मग हा चिखल वापरतात. कच्च्या विटा दाबामध्ये 18Kg./cm पर्यंत येते. कच्च्या विटा करण्याच्या दुसऱ्या पद्धतीत हातमशीन वापरतात. यात मातीत पाणी कमी प्रमाणात (१२ ते १५%) घालतात. चाळलेली माती ओली केल्यावर हाताला चिकटू नये, पण दाबल्यावर एकजीव झाली पाहिजे. या विटा सावलीत २८ दिवस वाळल्यावर मग वापराव्यात. माती व सिमेंट विटा : मातीच्या विटा वाळल्यावर व भट्टीत भाजल्यावर ते हलक्या व सच्छिद्र पण मजबूत होतात. संदर्भ : शिक्षक हस्त पुस्तिका V1 , इ. ९वी, पान नं.१३२ ते १३५.