पान:अभियांत्रिकी.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करताना इंटरलॉकिंग होऊन प्लॅस्टरला मजबुती येते. (१२) भिंत कितीही जाडीची असली तरी वीट बांधकामाची मजुरी ब्रासवर आकारली जाते. १ ब्रास म्हणजे १०० चौरस फूट. स्वाध्याय :(१) जॉब करताना केलेल्या कृतीचा फ्लो चार्ट तयार करा. (२) काम करताना आलेल्या अडचणी व त्यावर केलेली उपाययोजना लिहा. (३) बीट बांधकामासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा बाजारभाव पहा. (४) वापरलेल्या कच्च्या मालाची किंमत, मजुरी, अप्रत्यक्ष खर्च इ. च्या आधारे याची किंमत काढा. (५) बांधकामाची लांबी, रुंदी व जाडी मोजा आणि त्यावरून त्याचे घनफळ काढा. त्यानुसार १ घनमीटर कामासाठी लागणारे साहित्य ठरवा. विशेष माहिती : बांधकामाचा इतिहास व मजबुतीसाठी रचना मानव संस्कृतीमध्ये बांधकामाचे स्थान - (महत्त्व) मानवी संस्कृतीमध्ये बांधकामास खूप महत्त्व आहे. हजारो वर्षांपासून राजे महाराजे आपले नाव चिरायू होण्यासाठी आपल्या दरबारातील शिल्पकारांना भव्य बांधकाम (वास्तू) करावयास लावत. ५००० वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये फारोआ राजे मेल्यानंतर त्याची आठवण म्हणून पिरॅमिड बांधत. त्याची उंची साधारणतः ३०० फूट असे व ते ५-६ फूट आकाराचे चौकोनी दगड घेऊन बांधले जात. या शिल्पकारांनी आपले कौशल्य अशा प्रकारच्या भव्य रचना अचूकपणे करण्यामध्ये दाखवले. अजूनही हजारो प्रवासी, पर्यटक हे कौशल्य पाहण्यासाठी इजिप्तला जातात व पाहून आश्चर्यचकित होतात. भारतामध्ये वेरूळ येथे कैलास मंदीर अशा प्रचंड दगडातून कोरलेले आहे. त्याची उंची १२० फूट इतकी आहे. अलीकडच्या इतिहासामध्ये शाहजहाँ बादशहाने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ बांधलेला ताजमहाल सर्वांनाच परिचित आहे. इतिहासात मानव नेहमी आपली कल्पकता व कौशल्य त्या काळाच्या बांधकामातून व्यक्त करत असे. अजूनही आपण कोणत्याही गावी गेलो म्हणजे गावातील सुंदर घरे व गावाची चांगली मांडणी पाहून गाव सुंदर आहे असे म्हणतो. त्या काळातील शिल्पकार बांधकामातील छत बांधकाम करताना आपले कौशल्य पणाला लावीत. अगदी जुन्या काळात दगडाची भिंत बांधल्यानंतर छतासाठी आडवे दगड वापरीत, अजूनही जुन्या देवळात दगडाच्या खांबावर दगडाची तुळई पाहावयास मिळते. २००० ते २५०० वर्षांपूर्वी ग्रीक लोकांनी बांधलेल्या इमारती अशाच पद्धतीच्या होत्या. या बांधकामात खांब जवळजवळ ठेवावे लागत. यामुळे मोठ्या गाभाऱ्याचे काम शक्य होत नसे. या वेळेपर्यंत दगड व विटा प्रमुख बांधकाम साहित्य होते. ते ताणात कमकुवत असतात. त्यामुळे त्याचा बीम (तुळई)सारखा उपयोग करता येत नाही. पुढे जेव्हा दगड रचून मानव कमान बांधण्यास शिकला, त्यावेळेला त्याच्या बांधकामामध्ये पुष्कळ प्रगती झाली. या पद्धतीने गोल छत बांधण्यामध्ये रोमन लोकांनी आपले कौशल्य पणाला लावले. पुढे हेच कौशल्य अरब लोकांनी मशिदीच्या बांधकामासाठी उपयोगात आणले. अलीकडे आपल्या देवळांमागील किंवा वेशीच्या कमानी अशाच पद्धतीने बांधल्या जातात. साधारणत: ६०० ते ७०० वर्षांपूर्वी युरोपमध्ये वर्तुळाकार कमान बांधण्याऐवजी लंबगोलाकार कमान बांधण्यास सुरुवात झाली. वजनामुळे तुळईवर दाब येतो व त्यामुळे मध्यभागी वाक येतो, म्हणून दोन बाजूंच्या खांबांमधील अंतर ३८