Jump to content

पान:अभियांत्रिकी.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दक्षता: (१) गुण्या लावून आखणीचा काटकोन मोजून घ्या.(२) मॉर्टर पसरण्यापूर्वी कामाच्या जागेवर पाणी मारा. (३) शेजार शेजारच्या दोन विटांमध्ये अर्धा इंच अंतर ठेवा. (४) प्रत्येक थराला दोरी लावून विटांच्या थराची बाहेरील बाजू एका रेषेत आल्याची खात्री करा. (५) लेव्हल ट्यूब वापरून थरातील सर्व विटा समपातळीत आहेत, हे पहा. (६) मधून मधून गुण्याच्या मदतीने दोन भिंतींमधील काटकोन तपासा, (७) काटकोनाच्या जागी विटांची सांधमोड करा. (८) विटांच्या थरावर मॉर्टरचा थर देताना विटांच्या फटीत थापीने मॉर्टर दाबा. (९) मधूनमधून ओळंबा लावून भिंतीचा काटकोन तपासा. (१०) काम पूर्ण झाल्यानंतर विटांच्या दरवाजांमधील थोडे मॉर्टर थापीने काढा. (रेकिंग) आपणास हे माहीत आहे का? (१) पाणी समपातळीत राहते, या तत्त्वावर लेव्हल ट्यूब वापरून समान उंचीची आखणी केली जाते. (२) याच तत्त्वावर स्पिरिट लेव्हलच्या मदतीने आडवी पातळी तपासता येते. (३) स्ट्रेट एजच्या मदतीने विटा मागेपुढे झाल्या आहेत की एका लेव्हलमध्ये आहेत, ते पाहता येते. (४) सध्या मातीच्या आणि काँक्रीटपासून बनविलेल्या विटा बाजारात मिळतात. मातीच्या विटांचे आकारमान ९x४४३ (इंचात)तर काँक्रीटच्या ब्लॉकचे आकारमान १२४८४४ (इंचात) असते. (५) १ घनमीटर बांधकामासाठी साधारणपणे मातीच्या ५०० विटा लागतात. (६) भिंत ४,९ किंवा १४ इंच जाडीची बांधतात. यासाठी विटा आडव्या किंवा उभ्या ठेवल्या जातात. आडव्या विटेला स्ट्रेचर तर उभ्या विटेला हेडर म्हणतात. (७) बांधकामात विटांची रचना सलग उभे जोड येणार नाही, अशा प्रकारे केली जाते. या रचनांना बाँड म्हणतात. नेहमीच्या कामासाठी स्ट्रेचर, हेडर, इंग्लिश व फ्लेमिश बाँड वापरतात. स्ट्रेचर बाँड हेडर बाँड हेडर खाँड से (८) ४ इंची बांधकामात एकच वीट आडवी ठेवली जाते. या रचनेस स्ट्रेचर बाँड म्हणतात. यामध्ये मजबुतीसाठी दर ३ फुटानंतर काँक्रीटचा थर (ब्रिक बाँड) टाकतात. ९ इंची बांधकामात एक थर आडव्या विटांचा तर दुसरा थर उभ्या विटांचा या पद्धतीने बांधकाम केले जाते, या रचनेस इंग्लिश बाँड म्हणतात. दोन विटा आडव्या, त्यांच्या शेजारी एक वीट उभी ठेवली जाते. या रचनेस फ्लेमिश बाँड म्हणतात, फ्लेमिशा बॉट (१०) काटकोनात असलेल्या दोन भिंतीच्या कोपऱ्यावर विटांचे जोड सलग येऊ नयेत म्हणून विटांचे तुकडे वापरतात, यास सांधमोड म्हणतात. यासाठी वीट उभी किंवा आडवी तोडतात. उभ्या तुकड्यास क्लोजर आणि आडव्या तुकड्यास बॅट म्हणतात. (११) विटांच्या दरजांमधील थोडे मॉर्टर थापीने काढून घेतात, या क्रियेला रेकिंग म्हणतात. त्यामुळे प्लॅस्टर ३७