Jump to content

पान:अभियांत्रिकी.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कल्पना सुचली. मानव वीट बांधकामात मातीच्या कच्च्या, भाजलेल्या विटा, सिमेंट विटा आणि सिमेंट ब्लॉक वापरतो. आपण वीट बांधकामात विटांचे प्रकार, रचना यांचा अभ्यास करणार आहोत. बांधकामामध्ये वीट बांधकाम कसे करतात हे कौशल्यही शिकणार आहोत. निदेशकांनी करावयाची पूर्वतयारी : (१) प्रात्यक्षिकासाठी लागणारे साहित्य आणून/खरेदी करून ठेवा. उदा. विटा-१०० नग, माती-२०घमेले. (२) हत्यारे व साधने (टिकाव, खोरे, बादली, थापी, घमेले, ओळंबा, लाईन दोरी, लेव्हल टयूब इ.) प्रात्यक्षिकापूर्वी उपलब्ध करून ठेवावी. (३) शाळेतील बांधकाम (भिंत, पायरी) करणार असल्यास कच्चे मटेरिअल (सिमेंट, वाळू, खडी इ.) आणून ठेवा (४) जवळपास नवीन बांधकाम सुरू असल्यास परवानगी घेऊन विद्यार्थ्यांना ते दाखविण्याचे नियोजन करा. उपक्रमाची निवड ः (१) कच्च्या विटांचे मातीमध्ये बांधकाम करून बघणे. (सर्व प्रकारचे बाँड) (२) शाळेतील पायरी, ओटा बांधकाम करणे. (३) जवळच्या बांधकामाला भेटी देऊन निरीक्षण करून अहवाल लिहिणे. (४) केलेल्या बांधकामाचे अथवा घरांचे कच्चे ड्रॉईंग (Plan, Elevation, Side view) काढावे. (५) घर बांधणीचा पाया आखणे व बांधकाम करणे. (६) संडास, बाथरूम बांधणी प्रत्यक्ष बांधकामातून अनुभव, अपेक्षित कौशल्ये: (१) विटांच्या रचना व बाँडची ओळख असणे... (२) विटांचे प्रकार माहीत असणे, (३) विटांची सांधेमोड करता येणे. (४) साधने व हत्यारांचा वापर करता येणे. (५) विटांचा थर देण्यास शिकणे. (६) दोरी, ओळंबा व लेव्हल ट्यूब यांचा योग्य वापर करता येणे, (७) मॉर्टर तयार करता येणे. (८) मॉर्टरचा थर देता येणे. (९) क्युअरिंग करता येणे. शिक्षक कृती : (१)ओळंब्याचा वापर कसा करतात, ते दाखवा. (२) बाँडचे प्रकार समजावून द्या. (३) बाँडचा वापर कोणकोणत्या ठिकाणी करतात, याची माहिती द्या. (४) कामापूर्वी विटा ओल्या का करून घ्याव्यात, ते सांगा. (५) बांधकामामध्ये दोरी कशी लावतात, ते दाखवा. (६) लेव्हल ट्यूब वापरून समपातळीत कशी तपासतात, ते शिकवा, (७) सांधेमोड म्हणजे काय व ती कशी करतात, ते सांगा. (८) विटांचे थर मांडताना विटांची रचना कशी असते,ते दाखवा, साहित्य : चुना, लोखंडी पत्रा, विटा, सिमेंट, वाळू, पाणी इ. साधने : मेजरिंग टेप, गुण्या, चाळणा, घमेले, लेव्हल टयूब, स्पिरिट लेव्हल, घमेले, ओळंबा, दोरी, स्ट्रेट एज इ. हत्यारे : खोरे, हातोडी, थापी इ. कृती: (१) प्रथम कामासाठी लागणाऱ्या विटा ओल्या करून घ्या. (२) लोखंडी पत्र्यावर चाळलेली वाळू, सिमेंट आणि पाणी टाकून मॉर्टर तयार करा. (३) ठरलेल्या जागेवर प्लॅननुसार कामाची आखणी करा. (४) आखणी केलेल्या जागेवर थापीने मॉर्टर पसरा, (५) नंतर त्यावर विटांचा एक थर द्या. (६) विटांच्या थरावर पुन्हा मॉर्टरचा थर द्या. (७) अपेक्षित उंची मिळेपर्यंत वरील कृती पुन्हा पुन्हा करा. (८) बांधकामावर कमीत कमी ७ दिवस पाणी मारा.... (इंग्लिश बाँडमधील बांधकाम)