पान:अभियांत्रिकी.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बसवून पेच नटच्या साहाय्याने अनुयोजन (आकार लहान, मोठा) करून आटे पाडतात. याचा उपयोग मोठ्या दंडगोलावर आटे पाडण्यासाठी होतो. (४) डाय नट (Die Nut) : डाय नट हे चौकोनी किंवा षटकोनी आकाराचे असतात. टू-पीस डाय यात चार ते सहा आटे पाडण्यासाठी नाल्या सॉलिड डाय स्प्लीट डाय तयार केलेल्या असतात. याचा उपयोग रेंच किंवा स्पॅनरमध्ये बसवून खराब झालेले आटे खोल करून दुरुस्त करण्यासाठी डाय प्लेट होतो. डाय नट आटे कातभारी हत्यारे (५) डाय प्लेट (Die Plate) : ही आयताकृती कार्बन पोलादापासून तयार केलेली पट्टी असते व तिच्यावर सरळ रेषेत मध्यभागी वेगवेगळया मापाचे कर्तनदाते (आटे) पाडण्यासाठी केलेले असतात. आकृती: अखंड डाय स्टॉक (६) डाय स्टॉक : आटे पाडताना डाय ज्या साधनात घट्ट बसवून आटे पाडतात त्यास बहिस॒त्रक धानी (Die Stock) असे म्हणतात. डाय स्टॉक ओतीव पोलादापासून तयार करतात. डाय स्टॉकचे दोन प्रकार आहेत. (१) अखंड डाय स्टॉक (Solid Die Stock) (२) समायोजीत डाय स्टॉक (Adjustable Die Stock) : अखंड डाय स्टॉक अखंड असून त्याचे मधोमध वर्तुळाकार छिद्र असते. यात स्प्लीट/सॉलिड डाय बसवून आटे पाडतात. डाय पकडून ठेवण्यासाठी एका पेच नटची योजना केलेली असते. अॅडजेस्टेबल समायोजीत डाय स्टॉक डाय स्टॉक दोन आकारात उपलब्ध असते. यात डायसेट बसवून पेच नटच्या साहाय्याने समायोजन करून आटे पाडले जातात. डाय वापरताना घ्यावयाची काळजी : (१) बाह्य आटे पाडताना दडगालाचा पृष्ठभाग सफाइदार व सरळ असावा. (२) डाय वापरताना कुलंट (शीतोदक) वापरावे. (३) जॉब (कार्य) मेजावर शेंगड्यात घट्ट पकडून धरावे. (४) आटे पाडताना प्रथम अर्धा फेरा पूर्ण करून थोडे विरुद्ध सव्य, अपसव्य फिरवून पूर्ण करावा म्हणजे कापाचे तुकडे निघण्यास सोपे जाते. (५) काम झाल्यानंतर डाय व डाय स्टॉक साफ करून ठेवावे. दिवस : सहावा प्रात्यक्षिक : बांधकाम - वीट बांधकाम करणे. प्रस्तावना : मानवाचे पहिले निवासस्थान नैसर्गिक गुहा हेच होते. आपल्या इच्छेप्रमाणे घर बांधण्यास त्याला लाकूड, दगड व माती याचाच उपयोग करावा लागे. दगड, धोंडे फोडून तयार केलेले डबर हे एकावर एक रचून तो भिंत तयार करत असे. नंतर चिखल वापरून मधली पोकळी भरून काढत असे. त्यातून माणसाला विटांची ३५