पान:अभियांत्रिकी.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

निमुळते होत गेलेले असतात. फर्स्ट टॅपनंतर याचा वापर करतात. छिद्राच्या पृष्ठभागावर सर्व आटे पाडण्यासाठी याचा उपयोग होतो. तिसरा टॅप (प्लग/बॉटमिंग) याचा फक्त एक आटा निमुळता असून बाकी सर्व आटे मापात असतात. याचा वापर आट्याला योग्य आकार देण्यासाठी होतो. आटे पाडताना एकदम न पाडता या तीन टॅपच्या साहाय्याने हळूहळू पाडतात. आकृती: टॅपिंग करताना टॅप नेहमी सरळ दिशेने व थोडा विरुद्ध IIT टेष दिशेने फिरवावा म्हणजे कापाचे तुकडे बाहेर पडण्यास मदत होते. टॅपच्या डोक्याकडील भाग चौरस आकाराचा असतो. तो टॅपरेंचमध्ये बसवून टॅप रेंच फिरवून आटे पाडतात. टॅप रेंचचे वेगवेगळे प्रकार आहेत. पण सर्वसामान्य अॅडजस्टेबल टॅप रेंच वापरला जातो. मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी वेधन यंत्रासारख्या (ड्रील मशीन) यंत्रावर मशीन टॅप बसवून आटे पाडतात. तसेच लहान व्यासाचे आटे पाडण्यासाठी मशीन स्क्रू टॅप वापरतात. अचूक आटे पाडण्यासाठी मास्टर टॅप वापरतात. खूप खोल यंत्रभागात आटे पाडण्यासाठी कप्पी टॅप (Pully Tap) वापरतात. टॅप वापरताना घ्यावयाची काळजी : (१) टॅपिंग करताना वंगण (Lubricant) वापरावे. (जॉबच्या आतील भागात टॅपच्या साहाय्याने आटे पाडतात, त्याला टॅपिंग असे म्हणतात.) (२) टॅप रेंचमध्ये टॅप घट्ट पकडून ठेवावा. (३) ज्या छिद्रात आटे पाडावयाचे आहेत, त्याचे व टॅपचे आकार योग्य निवडावेत. (४) छिद्रात आटे पाडताना छिद्र सरळ रेषेत आहे का, ते तपासून घ्यावे. (५) कार्य (जॉब) शेगड्यात घट्ट पकडून ठेवावे. (६) आटे पाडताना टॅप रेंचच्या मुठीवर हलकासा दाब देऊन अर्धा फेरा पूर्ण करावा व नंतर थोडा उलट दिशेने येऊन पुन्हा फेरा पूर्ण करत जावे. दंडगोलाकार भागावर बाहेरून आटे पाडण्यासाठी डाय (Die = बहिसुत्रक) वापरतात व डाय नावाच्या कर्तन हत्याराने व्ही आकाराचे आटे पाडण्याच्या क्रियेस डाईंग (Dieing = बहिसंत्रण)असे म्हणतात. डाय हे वर्तुळाकृती चकतीसारखे साधन आहे. ते उच्च कार्बन पोलादापासून तयार करतात. तसेच संमिश्र पोलाद (Alloy Steel) व हत्यार पोलाद (Tool Steel) पासूनसुद्धा बनवितात. डाय हे हत्यार डायस्टॉकमध्ये स्क्रूच्या साहाय्याने घट्ट बसवून आटे पाडले जातात. डायचे मुख्य प्रकार खालीलप्रमाणे आहेत. (१) सॉलिड डाय (Solid Die) : ही एक गोल चकती असून याच्या मध्यावर आटेयुक्त छिद्र पाडलेले असतात. सॉलिड डाय वेगवेगळ्या छिद्राच्या मापाच्या, आकाराच्या असतात. त्यावर आट्याचा प्रकार व आकार लिहिलेला असतो. उपयोगानुसार त्याची निवड केली जाते. सॉलिड डाय डायस्टॉकमध्ये बसवून आटे पाडतात. याचा उपयोग जुने आटे खराब झाले असल्यास दुरुस्तीसाठी जास्त प्रमाणात होतो. (२) स्प्लीट डाय (Split Die) : स्प्लीट डायला एक खाच पाडलेली असते. या खाचेमुळे डायस्टॉकमध्ये डाय बसवून पेच नटच्या साहाय्याने आकार कमी-जास्त करून पूर्ण खोलीपर्यंत आटे पाडता येतात. (३) टू-पीस डाय (Two Piece Die) : या प्रकारची डाय दोन तुकड्यात विभागलेली असते. त्यांना डाय बीट (Die Bits) असे म्हणतात. त्या तुकड्यांवर व्ही आकाराचे दाते तयार केलेले असतात. डायस्टॉकमध्ये डायपीस ३४