________________
टाकी बनविण्यासाठी पुढील मटेरियलची (मालाची) आवश्यकता असते :- (१) M.S.रॉड (२) सॉकेट (३) अंगल (४) G..तार (५) वेल्ड-मेश (६) सिमेंट (७) चिकन-मेश (८) वाळू (९) बारदान (१०) पाणी संदर्भ : (१) शिक्षक हस्तपुस्तिका, इयत्ता नववीV1, पान नं. १९, २८, १२६ ते १२८. (२) ग्रामीण तंत्रज्ञान - पॅक्टीकल हँडबुक, पान नं.२२ ते ३२. दिवस : सहावा प्रात्यक्षिकाचे नाव : थ्रेडींग व टॅपिंग करणे. प्रस्तावना : कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन करताना यंत्राचा उपयोग केला जातो. परंतु छोट्या उद्योगांमधील कार्यशाळेत दुरुस्ती करताना किंवा जॉब करताना टॅप तसेच डाय रेंजचा वापर केला जातो. तयार होणारे आटे 'व्ही' आकाराचे असतात. उपक्रमाची निवड : (जॉबची निश्चिती करणे.) निदेशकांनी शाळेतील किंवा गावातील कोणते जॉब करता येतील याचा आढावा घ्यावा. पुढे दिलेले काही जॉब अभियांत्रिकी विभागात करता येतील. (१) विद्यालयातील पाण्याच्या तोट्या लिकेज असल्यास थ्रेडींग करून व्यवस्थित बसविणे. (२) ६mm रॉडला थ्रेडींग करून सर्व विद्यार्थ्यांना थ्रेडींगची पॅक्टीस देणे. (३) गावातील नळाची पाईपलाईन जोडून देणे. उद्देश : (१) ६mm.व्यासाच्या भरीव बारला थ्रेडींग करणे. तसेच अर्धा इंच व्यासाच्या G.I. पाईपला थ्रेडींग करणे. (२) लोखंडी पट्टीला व अँगलला ड्रिल करणे. तसेच टॅपचा वापर करून योग्य आकाराचे, मापाचे होल करणे. निदेशकांनी करावयाची पूर्वतयारी: (१) थ्रेडींग व टॅपिंगसाठी लागणारे कच्चे मटेरिअल तयार ठेवावे. (२) ६ mm. रॉड, 1 इंच G.I.Pipe, Flat - १० mm. हॅक्सॉ क्रोम ब्लेड, ऑईल, थ्रेडींग - टॅपिंगसाठीचे योग्य डायरेंज व डाय चेक करून घ्यावी. (३) थ्रेडींग व टॅपिंगचे प्रात्यक्षिक घेण्यापूर्वी त्याचा उपयोग कोठे केला जातो, ती ठिकाणे अगोदर पाहणी करून ठेवावी. नंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घेऊन जावे. अपेक्षित कौशल्ये : (१) रॉड व पाईपला थ्रेडींग करता येणे. (२) टॅप रेंजचा वापर करून टॅपिंग करता येणे. (३) योग्य साईजनुसार टॅप व डायचा वापर करता येणे. (४) प्लंबींगचे काम करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व हत्यारांचा वापर करता येणे. उपक्रम : १. जी.आय.पाईपवर आटे पाडणे व जोडणे. उद्दिष्टे : (१) जी.आय.पाईपवर आटे (थ्रेड) पाडणे. (२) दोन किंवा त्यापेक्षा जास्त पाईप्स सरळ व काटकोनात उपांगे वापरून जोडणे. साहित्य : जी.आय.पाईप, कटिंग आईल, जी.आय.कपलींग, जी.आय.एल्बो, जी.आय.टी., जी.आय.युनियन, जी.आय.क्रॉस, जी.आय.बेंड, व्हाईट लेड पेस्ट, ज्यूट (तागाची दोरी) इ. हत्यारे : स्टील टेप , हॅक सॉ, पाईप डाय सेट, पाईप व्हाईस, ऑईल कॅन, पाईप रेंच १२" किंवा १४" इ. कृती : (अ) आटे पाडणे: (१) इंच व्यासाची डायसेट डायस्टॉकमध्ये बसवा. (२) इंच व्यासाचा पाईप, व्हाईसच्या जबड्यात घट्ट बसवा. (३) हॅक सॉने आवश्यक लांबीचा पाईप कापून घ्या. (४) पाईपवर पाईपडाय बसवून घड्याळाच्या ३१