Jump to content

पान:अभियांत्रिकी.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१ . (५) शीटची लांबी, रुंदी व जाडी मोजा आणि त्यावरून शीटचे घनफळ काढा. त्यानुसार १ घनमीटर कामासाठी लागणारे साहित्य ठरवा. (६) हे तंत्र वापरून आणखी कोणती कामे करता येतील याचा अभ्यास करा. (1) वॉश बेसीन - साचा पद्धत फायदे : (१) पाणी अंगावर उडत नाही. (२) सर्व पाणी एका पाईपद्वारे जमा करून फुलझाडांसाठी वापरता येते. उपयोग कोठे होतो: (१) हॉटेल, घरगुती (२) प्रयोगशाळा (३) दवाखाने व इतर कृती : (१) वॉश बेसीनचा साचा घेणे, (२)त्यास ऑईल लावणे.(३) सिमेंट पाणी बनविणे. (४) बारदान वेगवेगळ्या आकारात कापणे (साच्यानुसार ४-५ तुकड्यात) (५) बारदान सिमेंटच्या पाण्यात बुडविणे / ब्रशने लावणे, (६) बारदान साच्यावर लावणे. (७) असे एकूण (बारदान-सिमेंट पाणी) ३ वेळा लावणे,३ थर कापणे, साहित्य : थापी, बारदान, ब्रश, घमेले, कात्री इ. माल : बारदान, सिमेंट, पाणी इ. किंमत : अ.क्र. मालाचे नाव लागलेला माल किंमत प्रति नग एकूण (रूपये)। बारदान १.५ मीटर ५ रू./ मीटर ७.५० सिमेंट २किलो २.४० रू./किलो ४.६० एकूण १२.३० २५% मजूरी ३.०० एकूण १५.३० टीपः (१) सिमेंट - पाणी प्रमाण १:१ घेणे. (२) साच्यात ऑईल लावल्याने बारदान चिटकत नाही. वॉश बेसीन चांगले बनते. (३) सिमेंट पाण्यात बारदान संपूर्णपणे बुडविणे, नंतर ज्या ठिकाणी छिद्र राहिले असतील तेथे ब्रशने सिमेंटचे पाणी लावावे. (II) पाण्याची टाकी बनविणे (सिमेंट) पाणी साठविण्याची क्षमता - २५० लीटर फायदे व उपयोग: (१) ही टाकी सिमेंटची असल्याने गंजत नाही. आकृती: (२) लोखंडी टाकीपेक्षा आयुष्य जास्त असते. (३) दुरुस्ती, तसेच उंची अगदी कमी वा जास्त करावयाची असल्यास सहज करता येते. (४) बनविण्यास अगदी सोपी असते. (५) कितीही मोठ्या आकारमानाच्या बनविता येतात. टाकी बनविण्याचे चार भाग करू (१) सांगाडा (२) वेल्डमेश - चिकनमेश बारदानसह (३) मोर्टरींग (४) क्युअरिंग ३०