पान:अभियांत्रिकी.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५) फ्रेमच्या दोन्ही बाजूला सारख्याच जाडीचा मॉर्टरचा थर येण्यासाठी (कव्हरिंग) फ्रेम जमिनीपासून थोडी वर ठेवा. (६) शीट चौरसाकृती दिसण्यासाठी त्याच्या बाजूच्या कडा नीट कोरून घ्या. (७) मॉर्टरवर पहिल्या दिवशी जास्त पाणी मारू नका. शिक्षक कृती : पुढील माहिती विद्यार्थ्यांना सांगणे. (१) बांधकामासाठी वापरायची वाळू धुवून का घ्यावी? (२) कोणत्या कामासाठी वाळू वापरायची आहे, यानुसार वाळूची चाळणी लहान किंवा मोठ्या छिद्राची वापरावी. (३) मॉर्टर कसे तयार करावे ते शिकवणे. (४) कव्हरिंगची आवश्यकता का असते, ते स्पष्ट करा. (५) मॉर्टर टाकल्यानंतर रॉडिंग का करतात ते सांगा. उभ्या पृष्ठभागावर मॉर्टर मारताना चिकन मेश बरोबर बारदान का लावतात, ते समजावून सांगा. (७) फेरोसिमेंट तंत्र वापरून पाण्याची टाकी कशी बनवावी? (८) याच तंत्राचा वापर करून भिंतीचे निघालेले प्लॅस्टर परत कसे करावे? (९) लोखंडी फ्रेम व चिकन मेशऐवजी बारदान वापरून मूळ वॉशबेसीनच्या साच्यात दुसरे वॉशबेसिन कसे बनविता येईल? (१०) या तंत्राचा वापर करून सिमेंटचा फुटलेला पत्रा कसा दुरुस्त करावा, ते सांगा. आपणास हे माहीत आहे का? (१) थापीचे आकारानुसार वेगवेगळे प्रकार पडतात. उदा. चौकोनी, बदामी इ. (२) रंधा लोखंडी किंवा लाकडी असतो. कामाच्या स्वरूपानुसार वेगवेगळ्या लांबीचा रंधा वापरतात. (३) सिमेंट आणि वाळू यांच्या मिश्रणास मॉर्टर म्हणतात. फेरोसिमेंटच्या वस्तू उदा. शीट, टाकी इ. तयार करताना मिश्रणाचे प्रमाण १:३ किंवा ४, तर फिनिशिंगसाठी १:१ असे घेतात. (४) मॉर्टर कालवताना १ किलो सिमेंटसाठी साधारणपणे अर्धा लीटर पाणी टकतात. यास वॉटर सिमेंट रेशो म्हणतात. यावर मॉर्टरची ताकद अवलंबून असते. जास्त पाण्याने सिमेंटचे बारीक कण वाहून जातात. (५) सिमेंटमध्ये पाणी मिसळल्यानंतर होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेमुळे सिमेंट घट्ट बनते. परंतु सिमेंटला पूर्ण मजबुती येण्यासाठी २० ते २१ दिवस लागतात. त्यामुळे पहिले २८ दिवस पाणी मारून सिमेंट ओले ठेवावे लागते. या प्रक्रियेला क्युअरिंग असे म्हणतात. हा कालावधी जॉबची जाडी, जॉबचा प्रकार, भौगोलिक परिस्थिती इ. नुसार कमीजास्त करतात. वाळूमध्ये माती नसल्यास, व्यवस्थित रॉडिंग केलेले असल्यास आणि योग्य कव्हरिंग केल्यास जॉबला क्रॅक जात नाहीत. फेरोसिमेंट तंत्रात सिमेंटबरोबर लोखंड वापरले जाते. लोखंडामुळे दाबाबरोबर ताण सहन करण्याची शक्तीसुद्धा वाढते. या तंत्रात आर.सी.सी. तंत्रासारखे जास्त लोखंड वापरण्याऐवजी फक्त लोखंडी फ्रेम व चिकन मेश वापरली जात असल्याने शीटची जाडी कमी होते. त्याने ते वजनाला हलके व स्वस्त असते. (८) काही वेळेस मूळ वस्तुच्या (उदा. वॉशबेसिन, सिमेंटपत्रा इ.) साच्यात दुसरी तशीच वस्तू तयार करायची असेल तर मॉर्टरऐवजी फक्त सिमेंट वापरतात. सिमेंटमध्ये तितकेच पाणी मिसळतात. यात सिमेंटला आधार म्हणून बारदान वापरतात. स्वाध्याय : (१) जॉब करताना केलेल्या कृतीचा फ्लो चार्ट तयार करा. (२) काम करताना आलेल्या अडचणी व त्यावर केलेली उपाययोजना लिहा. (३) फेरोसिमेंट शीटसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा बाजारभाव पहा. (४) वापरलेल्या कच्च्या मालाची किंमत, मजुरी, अप्रत्यक्ष खर्च इ.च्या आधारे फेरोसिमेंट शीटची किंमत काढा. २९