________________
चिकन मेश फेरोसिमेंट शिट 6mm रोड (M.S.) फेरोसिमेंट शिट साईज - 300 X 300 X 25 मिलीमीटर अ.क्र. मालाचे नाव वापरलेला माल दर किंमत (रुपये) 6mm. रॉड ०.२७०Kg. Rs.३०/- Kg. ८.१० चिकन मेश १Sq.ft. Rs.३/-Sq.ft. ३.०० वेल्डींगरॉड 9No. Rs.9/- No. जी.आय.तार 2 Meter Rs.9/-Meter २.०० वाळू ०.००२५ घनमीटर Rs.१०००/-प्रति घन मीटर २.५० सिमेंट १.०८३Kg. Rs.४/-Kg.. ४.३३ एकूण २०.९३ मजुरी व ओव्हरहेड मालाच्या २५% ५.२५ एकूण किंमत २६.१८ वरील ड्रॉईंगमध्ये दाखवलेली वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या मालाची अंदाजे किंमत रू.२६.०० असेल. साहित्य : एम.एस.राऊंड बार, वेल्डींग रॉड, चिकन मेश, बाईंडिंग वायर, सिमेंट, वाळू, पाणी, पॉलिथिन पेपर इ. साधने : ऐरण, मोजपट्टी, गुण्या, वेल्डींग मशीन, चाळणी, घमेले , बादली इ. हत्यारे: छिन्नी, हातोडा, मेश कटर, पक्कड,थापी, रंधा इ. कृती : (१) राऊंड बारचे चार तुकडे दिलेल्या मापात छिन्नीने तोडून घ्या. (२) नंतर ते चारही तुकडे एकमेकांना काटकोनात वेल्ड करून चौकोनी फ्रेम तयार करा. (३) दिलेल्या मापात कटरने चिकन मेश कापून घ्या. (४) नंतर ती चिकन मेश फ्रेमच्या गजावर थोडी दुमडून बाइंडिंग वायरने बांधून घ्या. (५) घमेल्यात वाळू, सिमेंट आणि पाणी टाकून मॉर्टर तयार करा. सपाट जागेवर पॉलिथिन पेपर टाकून त्यावर चिकन मेश बांधलेली फ्रेम ठेवा. त्यावर थापीने मॉर्टर टाका. (८) टाकलेले मॉर्टर गजाने चोळून (रॉडिंग) घ्या. (९) नंतर रंधा फिरवून मॉर्टर सपाट करा. (१०) साधारणपणे दोन तासांनी त्यावर बारदान ओले करून टाका. (११) तयार झालेल्या फेरोसिमेंट शीटवर कमीत कमी ७ ते जास्तीत जास्त १४ दिवस पाणी मारा. दक्षता : (१) चिकन मेश फ्रेमपेक्षा थोड्या जास्त मापाची कापा.फेअरो सिमेंट फ्लोचार्ट देणे. (२) मॉर्टर टाकल्यावर चिकन मेश बाहेर येऊ नये म्हणून ओढून बांधा. मॉर्टरसाठीची वाळू चाळून, धुवून घ्या. मॉर्टर तयार करताना प्रथम वाळू आणि सिमेंट थापीने चांगले कालवून नंतर पाणी टाका. २८