Jump to content

पान:अभियांत्रिकी.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिवस : पाचवा प्रात्यक्षिक : बांधकाम - फेरोसिमेंट शीट तयार करणे. प्रस्तावना : मानवी संस्कृतीमध्ये बांधकामास खूप महत्त्व आहे. ऐतिहासिक काळापासून मानव नेहमी कल्पकता व कौशल्य बांधकामातून व्यक्त करत असे. या काळात दगड व विटा हेच प्रमुख बांधकाम साहित्य होते. कालांतराने मानवाने बांधकामात लाकूड, लोखंड व सिमेंट यांचा वापर सुरू केला. निसर्गाच्या सान्निध्यात राहताना निसर्गातील रचना समजावून घेऊन या रचनांचा उपयोग त्याने बांधकामात आणला आहे. (सांगाडा पद्धत व तंतूमय पद्धत) तंतूमय पदार्थ बहुधा लवचिक असले तरी ताणात मजबूत असतात. जे पदार्थ ठिसूळ असतात.त्यात तंतुमय पदार्थ घातल्यास ठिसूळपणा कमी होतो. मॉर्टर सहज फुटते. त्यामध्ये बारीक तारेचे चिकनमेश घातल्यावर जास्त मजबूत फेरोसिमेंट होते. फेरोसिमेंट म्हणजे सिमेंट-मॉर्टर, ज्यामध्ये लोखंड असे पसरलेले असते की, त्याला लोखंडाची ताणांत मजबुती व मॉर्टर या दाबात कठीणपणा येतो.(फेरो म्हणजे लोखंड) फेरोसिमेंटमध्ये वेल्डमेश व चिकनमेश यांचा सांगाडा वापरतात. फेरोसिमेंट ते १" जाड असते. यामुळे RCC मध्ये हलके व स्वस्त करता येते. वेळ कमी लागतो. यापासून WC Pan, वॉश बेसीन, टाक्या, भिंती वगैरे तयार करतात. पूर्वतयारी : उपक्रमांची निवड : (१) गावातील लोकांचे अथवा शाळेतील टाकीचे गोलाकार किंवा चौकोनी झाकण तयार करा. (२) २०० लीटर पाण्यासाठी फेरोसिमेंट टाकी तयार करा. (३) शाळेच्या व-हांड्याला कोबा करा. (४) फेरोसिमेंटच्या शीटस् तयार करा. (वेगवेगळया साईजनुसार) उदा. भिंत बांधणे, पार्टीशन, संडास भिंत इ.) (५) चौकोनी वॉश बेसीन तयार करा. (६) कचराकुंडी तयार करा. निदेशकांनी करावयाची पूर्वतयारी : (१) प्रात्यक्षिकासाठी लागणारे साहित्य खरेदी करणे. उदा. ६ mm. रॉड, चिकनमेश, वेल्डमेश, बायडिंग तार, सिमेंट, वाळू, पाणी, पॉलिथीन पेपर इ. (२) साधने व हत्यारे उपलब्ध आहेत की नाही याची खात्री करून घ्या. (मोजपट्टी, छिन्नी, हातोडी, थापी,रंधा,पक्कड, मेश कटर, बादली, चाळणी, घमेले, गुन्या इ.)(३) ज्याठिकाणी फेरोसिमेंट शीट तयार करायची आहे ती जागा ठरवा. (४) विद्यार्थ्यांचे गट पाडून कामाची वाटणी करून द्यावी. (५) निश्चित केलेल्या ठिकाणी प्रात्यक्षिकासाठी लागणारे साहित्य व साधने यांची मांडणी करून ठेवा. शिक्षक कृती : (१) हॅक्सॉ ब्लेड वापर शिकवा. (२) फेरोसिमेंट तयार करण्याचे प्रमाण सांगा. (३) फेरोसिमेंट सांगाडा बांधणे शिकवा. अपेक्षित कौशल्ये : (१)शेअरिंग मशीनचा/हॅक्सॉ फ्रेमचा वापर करता येणे. (२)६ मि.मी. रॉड/बार कापता येणे. (३) फ्रेम वेल्डींग करता येणे अथवा तारेने बांधता येणे. (४) वेल्डमेश, चिकनमेश कापता येणे. (५) मेश बाईंडिंग तारेने बांधता येणे. (६)योग्य प्रमाणात मॉर्टर तयार करणे. (७)जाळीवर (मेश) मॉर्टर मारणे. (८) रंधा अथवा थापीचा वापर करणे. (९) क्युअरिंगचे ज्ञान असणे. (१०) क्युअरिंग करणे. किंमत काढणे (Costing) १. पुढील ड्रॉईंगचे निरीक्षण करा. दिलेल्या माहितीचा उपयोग करून ड्रॉईंगमध्ये दाखवलेली वस्तू तयार करण्यासाठी मालाची यादी करून अंदाजे किंमत काढा. (६ mm. रॉड- २२५ gm/m., सिमेंट – १.४ Kg./Liter, मॉर्टर प्रमाण - १.३) २७