पान:अभियांत्रिकी.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

निदेशकांनी करावयाची पूर्वतयारी : (१) प्रात्यक्षिकासाठी लागणारे साहित्य : उदा.सोल्डर फ्लक्स, सोल्डर लँप, खड्या इ. टेबलावर काढून ठेवावे. (२) ब्लो लँप चालू स्थितीत आहे की नाही ते पहावे व चालू स्थितीमध्ये लँप ठेवावा. (३) प्रात्यक्षिकासाठी material, G.I.Sheet, कात्री, मॅलेट इ. काढून ठेवावे. निदेशक कृती: (१) विद्यार्थ्यांना सोल्डर कसे करायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखवावे. (२) विद्यार्थ्यांना कार्डशिटवर कटींग तसेच घडी घालणे याचा सराव करण्यास सांगावा. (३) विद्यार्थ्यांना GI. Sheet वर मोजमाप घेऊन कटिंग करावयास सांगावे. तसेच पत्र्याची घडी घालून एकमेकांस दोन टोके जोडून दाखवावीत. अपेक्षित कौशल्येः (१) G.I.Sheet योग्य मापात कापता येणे. (२) ब्लोअर लँप पेटविता येणे. (३) पत्र्याची घडी एकमेकांत जोडून फिक्स करणे व सोल्डर करणे, (४) जोड फ्लक्सच्या साहाय्याने स्वच्छ करता येणे. साहित्य : G.I.Sheet, हायड्रोक्लोरिक आम्ल , फ्लक्स, सोल्डर , कार्ड शीट इ. आकृती साधने: मोजपट्टी, स्टेक , ब्लो लँप इ. हत्यारे: रेखणी मॅलेट, खड्या, स्लिप कानस, पक्कड इ. कृती: (१) सुरुवातीस कार्डशीट कट करून त्याची योग्य मापात घडी घालणे. (२) दोन कार्डशीट एकमेकांत घड्या घालून जोडणे, (३) आकृतीतप्रमाणे पत्र्याच्या घड्या घाला. (४) जोडाची जागा कानशीने घासून आणि नंतर हायड्रोक्लोरिक आम्लाने स्वच्छ करा (५) जोडाच्या जागेवर फ्लक्स लावा. (६) ब्लो लपच्या ज्योतीवर धरून खड्या लाल दिसेपर्यंत गरम करा. (७) गरम खड्या झिंक क्लोराईडमध्ये बुडवा, (८) नंतर खड्या सोल्डरला लावा म्हणजे खड्याला थोडे सोल्डर चिटकेल. (९) खड्या अमोनिअम क्लोराईडमध्ये बुडवा म्हणजे खड्याला चिकटलेले सोल्डर खड्याच्या टोकावर पसरेल. (१०) जाड पकडीत व्यवस्थित धरून जोडावर एका ठिकाणी खड्या टेकवा. (११) जोड गरम झाल्यावर खड्या जोडाच्या कडेने फिरवा. (१२) जोड थंड होऊद्या. नंतर तो स्वच्छ करून धुवा व कोरडा करा. दक्षता: (१) घड्या घालताना पत्रा वाकल्यास मॅलेटने ठोकून सरळ करा. (२) जोडाच्या जागी धूळ, तेलकटपणा व गंज राहणार नाही, याची काळजी घ्या. (३) हायड्रोक्लोरिक आम्ल लावताना अंगावर किंवा कपड्यावर सांडणार नाही, याची काळजी घ्या. (४) खड्या गरम करण्यापूर्वी कानशीने घासून घ्या. (५) ब्लो लँप पेटवताना त्याचे तोंड भिंतीकडे करा. (६) खड्या प्रमाणापेक्षा जास्त तापवू नका, (७) साफ करून गरम खड्या व्यवस्थित गरम झाला आहे असे समजा. (८) सोल्डरींग करताना जॉबची बाजुची जागा गरम होऊ नये म्हणून त्या जागेवर ओले कापड टाका. (९) गरम खड्या टेबलवर, बेंचवर किंवा बेंचखाली ठेवू नका. (१०) शेवटी सर्व जोडांवर सोल्डरींग व्यवस्थित झालेले आहे याची खात्री करा. २६