Jump to content

पान:अभियांत्रिकी.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मूल्यमापन: (१) मार्किंग गेज व मॉर्टीस गेज यातील फरक सांगा. (२) गुण्या (TrySquare) चा सुतारकामात उपयोग काय? उपघटक ३.३ : पकडणारी व इतर साधने प्रस्तावना : सुतारकामात पकडकाम करण्यास खालील साधने वापरतात. (१) सुतारी शेगडा (Carpenter's Vice), (२) जी क्लॅम्प ('G' Clamp), (३) शिंकजा (Sash Clamp), (४) अंबूर (Pincer), (५) स्पॅनर्स (Spanners), (६) प्लायर्स इत्यादी. (१) सुतारी शेगडा (Carpenter's Vice) : हा सुतारी शेगडा शेगडा सुतारकामाच्या टेबलावर एका बाजुने सरकवा जवा - स्थिर जना बसवलेला असतो. लाकडावर विविध क्रिया (Movable Jaw) (Fixed Jaw) करताना त्यास घट्ट पकडून ठेवण्यासाठी याचा वापर करतात. हा शेगडा फक्त सुतारकामात वापरण्यास योग्य असल्यामुळे यास सुतारी शेगडा (Carpenter's vice) असे म्हणतात. हा शेगडा बिडापासून (Cast Iron) -मूठ (Handle) तयार केलेला असतो. जी क्लॅम्प (२) जी क्लॅम्प (G Clamp) : याला मराठीत 'जी' भिड असे म्हणतात. भिडचा आकार इंग्रजी 'G' अक्षरासारखा असल्यामुळे यास 'जी' भिड असे म्हणतात. ही पोलादाची (Steel) बनवलेली असते. याचा उपयोग टेबलावर कापकाम आणि खाचकाम करताना लाकूड पक्के पकडून ठेवण्यासाठी तसेच प्लायवूडवर सिरस लावून सनमायका बसवल्यावर दोघांना दाब देऊन पकडून ठेवण्यासाठी करतात. (३) शिंकजा (Sash Clamp) : सुतारकामात कार्य करताना त्यांचे सांधे तयार करून ते नंतर सरस किंवा खिळे वापरून पक्के करतात. अशा वेळेस सांधे आवळून ठेवण्यासाठी शिंकजाचा वापर करतात. याचे भाग पोलादाचे (Steel) असतात. हे १ मी. ते २ मी. मापात उपलब्ध आहे. उपक्रम : १) कमीत कमी खर्चात फर्निचर्स कसे बनवाल ? २) जवळील सॉ मीलला भेट द्यावी. विविध लाकडांची माहिती घ्या. संदर्भ- : लाकूड काम शिक्षक हस्तुपुस्तिका, इ. ९वी, पान नं.५५ ते ५६. दिवस : चौथा प्रात्यक्षिकाचे नाव : सोल्डरिंग करणे प्रस्तावना : सोल्डर करताना पत्र्याचे दोन तुकडे एकमेकांना जोडले जातात. फ्लक्सच्या मदतीने जॉब स्वच्छ करून घेणे. सोल्डर हा टिन (कथील) आणि लीड (शिसे) यांचा मिश्र धातू आहे. ज्या धातुंना सांधावयाचे आहे त्यांचा मेल्टींग पॉईंट सोल्डरच्या मेल्टींग पॉईंटपेक्षा अधिक असावा. सोल्डर प्रवाही असणे अपेक्षित आहे. G.I.Sheet ला जोड देणे हे या प्रात्यक्षिकातून पाहूयात. २५