पान:अभियांत्रिकी.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असते. टेबलावरील फळ्या तोडकाम व ठोकाठोकी याने खराब होऊ नयेत म्हणून त्या जास्त जाडीच्या असतात. काम करताना लाकूड पकडण्यासाठी टेबलाच्या दुसऱ्या बाजूस सुतारी शेगडा बसवतात. विद्यार्थ्यांना सुतारी विभागातील टेबल दाखवून अधिक स्पष्ट करावे. (२) कानस : सुतारकाम करताना कानस वापरून काही कामे करावी लागतात. लाकूडकामात वापरण्यात येणाऱ्या कानसी खालीलप्रमाणे : (१) चपटी कानस (२) अर्धगोल कानस (३) गोल कानस (४) त्रिकोणी कानस (५) मार्फा (रास्प फाईल). FERULE HANDLE (३) स्क्रू ड्रायव्हर (पेचकस) : पेचकस (Screw Driver) म्हणजे स्क्रू कसण्यासाठी वापरण्यात येणारे साधन होय. पेचकसाचे रचनेत दोन भाग असतात. (अ) पाते (Blade) : हे पाते पोलादाचे असते. पात्याची लांबी म्हणजे पेचकसचा आकार होय. (ब) मूठ (Handle) : मूठ लाकडाची किंवा प्लॅस्टिकची तयार करतात. पकडण्यास सोईची असते. (४) बडी (Bevel Square) : याचा उपयोग विविध कोनात कार्यावर आखणी करण्यासाठी, कोनांचे मापन करण्यासाठी, लाकडी वस्तुमधील विविध कोनांची तपासणी करण्यासाठी करतात. हे तपासणी व आखणी करणारे साधन आहे. हा एक प्रकारचा गुण्या असून, याचे कडाशी समांतर गाळा असलेले पाते खोडास विविध कोनात विंग नटाच्या साहाय्याने घट्ट करता येते. (५) स्क्रायबर (Scriber) : पोलादी तारेपासून बनवितात. एका बाजूस कोनिकल पॉईंट व दुसऱ्या बाजूस चपटा भाग असतो. सरळ आखणीसाठी याचा उपयोग करतात. (६) मॉर्टीस गेज (Mortise Guage) : याची रचना मार्किंग गेज सारखीच असते. या गेजद्वारे लाकडाच्या कडेस एका वेळेस दोन समांतर रेषा आखता येतात. यात एका दांड्याऐवजी एकात एक सरकणारे दोन दांडे असून प्रत्येकावर एक एक अणी असते. या दोन्ही अणीमध्ये आवश्यक अंतर ठेवून आखणी करतात. २४