Jump to content

पान:अभियांत्रिकी.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

STEEL BLADE STOCK भागात (अ) गुण्या (Try Square) : गुण्याचे दोन भाग असतात. एका भागावर इंचाचे किंवा सेंटिमीटरचे माप असते. या पट्टीशी दुसरा भाग काटकोनात बसवलेला असतो. गुण्याचा उपयोग एक पृष्ठभाग दुसऱ्या पृष्ठभागाशी काटकोनात आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी, रंधलेला पृष्ठभाग समपातळीत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी करतात. (ब) मार्किंग गेज (Marking Guge) : मार्किंग गेज लाकडापासून तयार करतात. हे लाकडाच्या कडेशी समांतर रेषा आखण्यासाठी उपयोगात येते. हे खालील भागात बनवलेले असतात. (१) खोड (Stock) (२) दांडा (Stem) (३) रेखनाचा टोकदार LOT खिळा (४) स्क्रू इत्यादी. (१) खोड (Stock) : खोड साधारणतः ५० मि.मी. चौरस असलेला व २५ मि.मी. जाड असलेला ठोकळा आहे. याच्या मध्यभागी दांडा (Stem) सरकता राहावा म्हणून चौरस छिद्र असते. (२) दांडा (Stem) : हा चौरस काटछेद असलेला जवळजवळ २०० मि.मी. लांबीचा दांडा असतो. हा खोडाच्या मध्यभागी असलेल्या छिद्रात सरकता ठेवलेला असून यावर मि.मी. व इंचाच्या खूणा असतात. (३) रेखनाचा टोकदार खिळा : याद्वारे लाकडावर रेषा आखतात. अंगुष्ठ पैच (Thumb Screw) दांडा (Stom) खोड (Stock) - अणी (Spur) याचा उपयोग दरवाजाच्या चौकटी, झडपा व खिडक्यांच्या चौकटी यांचे जोडणीसाठी करतात. (ड) अंबूर (Pincer) : अंबूर ओतीव पोलादाचे तयार केलेले असते. याचा उपयोग | अंबूर खिळा काढण्यासाठी करतात. (इ) स्पॅनर्स (Spanners) : लाकडाचे काम करताना नट-बोल्ट, चौरस डोक्याचे स्क्रू वगैरे बसवावे लागतात, ते बसवण्यासाठी व काढण्यासाठी स्पॅनर्स वापरावे लागतात. हे ६ इंच ते १५ इंचपर्यंत लांब असतात. ते पोलादाचे बनवलेले असते. याचे विविध प्रकार आहेत. जसे (१) अॅडजेस्टेबल स्पॅनर (Adjustable Spanner) (२) दुतोंडी स्पॅनर (Double ended Spanner) (३) बॉक्स टाईप स्पॅनर (Box Type Spanner) (फ) प्लायर्स (पक्कड) : साईड कटर प्लायर, प्लेट नोज प्लायर, राउंड नोज प्लायर इत्यादी प्रकारचे प्लायर असून त्यांचा उपयोग खिळे, स्क्रू इत्यादी घट्ट पकडण्यासाठी होतो. प्लायर्स वेगवेगळया आकाराचे, लांबीचे उपलब्ध आहेत. सुतारकाम वापरात येणारी इतर साधने : (१) सुतारकामाचे टेबल (२) कानस (३) स्क्रू ड्रायव्हर (पेचकस) (१) सुतारकामाचे टेबल : सुतारकाम करावयाकरिता सर्वप्रथम जर काही वापरावे लागत असेल तर ते सुतारकामाचे टेबल होय. हे नेहमीच्या टेबलसारखे असले तरी ते जास्त मजबूत असते. ते टणक लाकडापासून तयार करतात. याची सर्वसाधारणपणे लांबी १५० सेमी, रुंदी ७५ सेमी, उंची ७५ सेमी २३