________________
LALL (ड) छिद्र यंत्र (हँड ड्रिल) (Hand Drill): छिद्र जलद गतीने पाडण्यासाठी या हँड ड्रिल मशीनचा उपयोग करतात. हे यंत्र हाताने फिरवतात. विविध आकाराची छिद्रे पाडण्याकरिता विविध ड्रिल वापरतात. दुची पिनियन निगा आणि काळजी: (१) छिद्र पाडण्यापूर्वी ड्रिल हव्या त्या आकाराचेच असल्याची खात्री करावी. (२) ड्रिलला योग्य धार लावावी. (३) छिद्र पाडावयाच्या जागी खिळे /धातू नाही याची खात्री करावी, (४) ड्रिल मशीन पृष्ठभागाशी काटकोनात धरण्याची काळजी घ्या. मूल्यमापनः (१) छिद्र पाडण्याकरिता कोणकोणती हत्यारे वापरतात? (२) छिद्र पाडण्याच्या हत्यारांची निगा व काळजी कशी घ्याल? उपघटक २.५ : ठोकणारी हत्यारे (Stroking tools) प्रस्तावना : सुतारकामात हातोडी ही ठोकण्याचे हत्यार आहे. तिचे प्रकार खालीलप्रमाणे : (अ) गोल माथ्याची (बॉलपीन) हातोडी (Ballpin Hammer) : या हातोडी ओतीव पोलादाच्या असतात. हातोडीच्या माथ्याचा आकार गोल चेंडूसारखा असतो म्हणून यास गोल माथ्याची हातोडी असे म्हणतात. सर्वसाधारण ठोककामासाठी हातोडीच्या पृष्ठाचा उपयोग करतात, तर माथ्याचा उपयोग रिव्हेट ठोकण्यासाठी करतात. (ब) पंजा हातोडी (क्लॉ हातोडी) (Claw Hammer) : सुतारकामात सर्वात जास्त उपयोगात येणारी हातोडी म्हणजे क्लॉ हॅमर होय. हातोडीच्या माथ्याचा उपयोग लाकडातील खिळे काढण्यासाठी करतात व पृष्ठभागाचा उपयोग खिळे ठोकण्यासाठी करतात. (क) मोगर (Mallet) : मॅलेट म्हणजे कठीण लाकडापासून तयार केलेली हातोडी होय, हिस ठोकणी असे म्हणतात. हिचा माथा व पृष्ठ एकाच आकाराचे असते. मोगर बाभूळ किंवा खैर यांसारख्या लाकडपासून तयार करतात. पटाशीसारखी हत्यारे याच ठोकणीने ठोकतात. निगा आणि काळजी: (१) पाचर नीट बसवलेली आहे किंवा नाही याची खात्री करावी. (२) फटके मारताना दांड्याचे टोक धरावे. (३) क्लो हातोडीने खिळे काढताना हातोडीच्या खाली पातळ फळी घालावी म्हणजे लाकूडकामाचा पृष्ठभाग खराब होणार नाही. (४) पटाशीवर ठोकताना मॅलेटचाच उपयोग करावा. २१ HOLL