________________
कार्यशाळेत बहुतेक याच प्रकारच्या रंध्याचा वापर करतात. या रंध्याचे खोड बीड (Cast Iron) पासून तयार केलेले असते. लाकडी रंध्यापेक्षा लोखंडी रंधा वापरणे फायद्याचे असते. कारण (१) यात रंध्याचे पाते लावण्याचे व काढण्याचे काम लवकर करता येते. (२) रंध्याच्या तोंडातून लाकडाचा भुसा त्वरित बाहेर येतो. (३) या रंध्याची मांडणी लवकर करता येते त्यामुळे वेळेची बचत होते. रंध्याचे प्रकार खालीलप्रमाणे : १. जॅक प्लेन (Jack Plane) : लाकडी व लोखंडी दोन्ही प्रकारचे रंधे यामध्ये असते. सर्वसाधारण रंधकामासाठी हा रंधा वापरतात. याची लांबी १५ इंच आणि रुंदी सुमारे २१ इंच असते. स्मूथिंग प्लेन (Smoothing Plane) : याला बैठा रंधा असे म्हणतात. हा सुद्धा लाकडी व लोखंडी दोन्ही प्रकारचा असतो. याची लांबी १० इंच आणि रुंदी २३ इंच असते. याचा उपयोग कोणतीही वस्तू जोडण्यापूर्वी त्याचे पृष्ठभाग चांगले व गुळगुळीत करण्यासाठी होतो. निगा आणि काळजी: (१) ज्या कामासाठी जो रंधा योग्य असेल तोच वापरावा. (२) रंध्याच्या पात्याची धार चांगली असावी. नंतरच काम सुरू करावे. (३) रंधा नेहमी एका बाजूवर टेकून ठेवावा. पात्यावर टेकून ठेवू नये. (४) पात्यास गंज चढू नये म्हणून ग्रीस लावावे. मूल्यमापन: (१) रंध्याचे प्रकार सांगून माहिती लिहा. (२) रंध्याची निगा व काळजी कशी घ्याल? उपघटक २.४ : छिद्र पाडणारी हत्यारे (Boaring Tools) प्रस्तावना : लाकडावर निरनिराळ्या व्यासाची छिद्रे पाडण्याकरिता विविध हत्यारांचा उपयोग केला जातो. यामध्ये गिरमीट (जिलमेट), सामता कसणी , डोलमिट (रॅचेट ब्रेस), छिद्र यंत्र (हँड ड्रिल) या हत्यारांचा वापर केला जातो. (अ) गिरमीट (जिलमेट) : ज्या कामात मोठी व खोल भोके पाडावयाची असतात अशा कामात गिरमीट वापरतात. हे उत्तम प्रकारच्या पोलादाने बनलेले असते व विविध आकारात उपलब्ध असते. गिरमीटच्या पोलादी गजाला पीळ पाडलेला असतो व खालच्या टोकाला धार लावलेली असते. हे हाताने फिरवून वापरतात. (ब) सामता कसणी : लहान छिद्र पाडण्याकरिता याचा उपयोग होतो. सामता कसणीच्या साहाय्याने मागेपुढे फिरवतात. कसणीमधे कातड्याची वादी /दोरी बसवतात. (क) डोलमिट (रॅचेट ब्रेस) (Ratchet Breace) : अगदी अडचणीच्या जागी छिद्र पाडावयाचे असल्यास याचा उपयोग होतो. चकमध्ये हवे ते पाते बसवून आणि डोक्यावर दाब देऊन मूठ फिरवली की छिद्र पडू शकते व हे एकाच दिशेने फिरवता येते. सामता २०