पान:अभियांत्रिकी.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२. पट्टी करवत (Tenon Saw) : या करवतीस पातळ पाते असून तिची रुंदी एकसमान असते. पाते ताठ राहण्यासाठी वरील बाजूस लोखंडी पट्टी बसवलेली असते. या पट्टीमुळे पाते वाकत नाही. हिचा उपयोग टेनन व लहान लाकूड कापण्यासाठी करतात. ३. डोव्हटेल सॉ (Dovetail Saw) : या करवतीचे पाते पट्टी करवत (टेनन सॉ) सारखेच असते. परंतु ही आकाराने लहान असते. हिचा उपयोग डवरी सांधा करण्यासाठी होतो. ४. कंपास करवत (Compass Saw): नमुना कामात (Pattern making)या करवतीचा बक्राकार कापकामास उपयोग केला जातो, ही करवत निमुळत्या टोकदार पात्याची असून उघड्या मुठीची असते. हिची लांबी १५० ते ३०० मि.मी. असते. छिद्र करवत (Key Hole Saw): फर्निचर कामात चाब्यांचे छिद्र तयार करण्यासाठी या करवतीचा उपयोग करतात. या करवतीचे पाते टोकदार, लहान व आखूड असे असते. निगा व काळजी : (१) लाकडावर काम करताना करवतीला व्यवस्थित धार लावावी. (२) करवती गंजू नयेत म्हणून पातींना ग्रीस किंवा तेल लावावे. मूल्यमापनः (१) करवतीचे (सॉ) विविध प्रकार सांगा. (२) टेनन सॉ व कंपास सॉची माहिती लिहा. (३) करवतीची निगा व काळजी कशी घ्याल. उपघटक २.३ : रंधणारी हत्यारे (Planning Tools) प्रस्तावना : रंधा (Plane) सुतारकामात हे अत्यंत महत्त्वाचे हत्यार होय. लाकडाचा खडबडीत पृष्ठभाग समपातळीत आणण्यासाठी रंध्याचा उपयोग होतो. रंध्याच्या अंगावरून त्याचे दोन प्रकार आहेत. (अ)लाकडी रंधा (ब) लोखंडी रंधा(Iron Plan | जवाuron Fian मा पर ) (अ) लाकडी रंधा (Plane): लाकडी रंधा म्हणजे लाकडापासून तयार केलेला रंधा होय. हा रंधा साग, बीच, बाभूळ किंवा शिसम या प्रकारच्या उत्तमरितीने रापवलेल्या लाकडा पाते (Binda) तर टोच (UnrCup) पासून तयार केलेला असतो. दुय्यम घात (Iren Corp) माळसूत्र (Adjusting (ब) लोखंडी रंधा (Iron Plane) : फ्राँण (Pre) गोला मूठ (Khoth लोखंडी रंधा म्हणजे लोखंडापासून तयार केलेला रंधा. सुतारकाम