Jump to content

पान:अभियांत्रिकी.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२. मॉर्टिस पटाशी (Mortise Chisel) : या पटाशीचे पाते इतर प्रकारापेक्षा वेगळे असून जाड असते. या पटाशीचा उपयोग लाकडात विधी म्हणजे आयताकृती छिद्र पाडण्यासाठी करतात. यास सड्या/किंकर सुद्धा म्हणतात. ३. तास पटाशी (Paring Chisel); या पटाशीचे पाते कमी जाडीचे असून लांब असते. तिचा उपयोग गाळे, खाचा व टप्पे यांच्यामधील कोपऱ्याची सफाई करण्यासाठी करतात. या पटाशीचे काम हाताने ठोके मारूनच करतात. याला चांगली धार असावयास हवी. हिच्या वापरात मॅलेटचा (Mallet) वापर करत नाहीत. ४. बेव्हल पटाशी (BevelChisel): ही पटाशी तास पटाशीसारखीच असून दोन्हींचा उपयोग सारखाच आहे. फक्त हिचे पाते जास्त जाडीचे असून कमी लांब असते. हिचे काम सुद्धा हाताने ठोके मारूनच करतात. ५. गोबारे किंवा नाक्या (Gouge) : या पटाशीचा उपयोग आंतरवक्र व बहिर्वक्र भागाचे तासकाम करण्यासाठी करतात. या पटाशीचे पाते वक्राकार म्हणजे पन्हाळीच्या आकाराचे असते. निगा व काळजी: (१) पटाशीला वाड आणि धार योग्य त्या कोनात आहे की नाही ते पहावे. (२) मूठ नीट बसलेली असावी. (३) लांब पात्याच्या पटाशीवर हाताच्या दाबानेच काम करावे. (४) पटाशीने काम करताना वस्तुखाली लाकूड ठेवावे. (५) पटाशी गंजू नयेत म्हणून तेल लावावे. मूल्यमापनः (१) पटाशीचे विविध प्रकार सांगा. (२) पटाशीची निगा व काळजी कशी घ्याल? (३) गोबारे किंवा नाक्या या पटाशीचा उपयोग कोठे करतात? उपघटक २.२ : कापणारी हत्यारे (Sawing Tools) प्रस्तावना : सुतारकामात कापणारे हत्यार म्हणून करवतीचा (Saw) वापर करतात. करवत (Saw) : लाकूड कापण्याकरिता वापरण्यात येणारे हत्यार म्हणजे करवत होय. हिचा उपयोग वृक्षापासून लाकूड प्राप्त करण्यापासून तर वस्तू तयार करण्याची शेवटची क्रिया करण्यापर्यंत करतात. हिला आरी असे सुद्धा म्हणतात. हिचे पाते उत्तम प्रकारच्या पोलादाचे असते. सुतारकामात खालील प्रकारच्या करवती वापरतात. १. हात करवत (Hand Saw) : या करवतीचा उपयोग सर्वसाधारण कापकामांसाठी केला जातो. हिचे पाते ___ अग्राकडे (Top) अरुंद व पापणी (Heel) कडे रुंद असते. या पात्याच्या सरळ असलेल्या कडेवर व्ही (V) आकाराचे दाते कापलेले असतात. या दात्यांच्या प्रकारावरून या करवतीचे दोन प्रकार आहेत. (अ) रीप सॉ (Rip Saw) : हिचा उपयोग लाकूड सळांच्या सरळ कापण्यासाठी म्हणजे लाकूड उभे कापण्यासाठी करतात. पाते (Blade) (ब) क्रॉस कट (Cross Cut Saw) : T(Handle) हिचा उपयोग लाकूड सळांच्या आडवा कापण्यासाठी करतात. ald (Tooth)