Jump to content

पान:अभियांत्रिकी.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२) टी व एल सांधे तयार करणे. (३) स्विच बोर्ड तयार करणे. (४) शाळेतील लाकडी खुर्ची, बेंच, टेबल दुरुस्त करणे. (५) प्लायवूड, फळी कापणे. अपेक्षित कौशल्ये :(१) हत्यारे ओळखता येणे. (२) हत्यारांचे उपयोग सांगता येणे. (३) धार लावणे. (४) दिवड पाडणे. (५) हत्यारांचा वापर किंवा चालवता येणे. शिक्षक कृती: (१) सुतारकामातील हत्यारे व साधने टेबल मांडणी करून ठेवणे. (२) प्रत्येक हत्यार विद्यार्थ्यांना दाखवून त्याचे नाव, उपयोग व कार्य समजावून देणे. हत्यारांना धार लावण्यासाठी विद्यार्थ्यांचे उपगट तयार करणे. (उदा. १५ विद्यार्थी संख्या असल्यास ५ जणांचा १ याप्रमाणे ३ गट करणे.) गटानुसार हत्यारे व साधने यांची वाटणी करणे. (५) धार लावणे व दिवड पाडणे याचे प्रात्यक्षिक करून दाखवणे. (६) विद्यार्थ्यांना गावातील सुतारांच्या मुलाखती घेण्यास, त्याच्याबरोबर चर्चा करण्यास सांगणे. विशेष माहिती: पटाशीचा निसण्याच्या पृष्ठभागाशी साधारणपणे 35 ते 45°चा कोन राहील अशा स्थितीत पुढे घासा. साध्या निसण्यापेक्षा ऑईनस्टोनवर धार चांगली व लवकर येते. दिवड पाडण्यासाठी दिवडपट्टी किंवा सॉ सेटींग प्लायर (पक्कड) वापरतात. प्रात्यक्षिकाचे नाव : धार लावणे, दिवड पाडणे, अपेक्षित कौशल्ये ः (१)धार लावणे. (२)दिवड पाडणे. साहित्य : पटाशी, करवत इ. साधने व हत्यारे: निसणा, सॉ सेटिंग प्लायर किंवा दिवड पट्टी इ. कृती: (१) धार लावणे. (१) निसण्यावर थोडे पाणी टाका. (२) पटाशीचा निसण्याच्या पृष्ठभागाशी साधारणपणे ३० ते ३५ अंशांचा कोन राहील अशा बेताने तिची चप मारलेली बाजू निसण्यावर मागे पुढे घासा. घासण्याची क्रिया बऱ्याच वेळा करा. घासताना मध्ये मध्ये थोडे पाणी टाकत जावे. (४) धार लावून झाल्यावर पटाशीची सपाट बाजू निसण्यावर समांतर घासा. (२) दिवड पाडणे. (१) करवतीची एक बाजू समोर धरून सॉ सेटिंग प्लायरने एकाआड एक दात आपल्या बाजूस वाकवा. (२) करवतीची दुसरी बाजू समोर धरून राहिलेला एकाआड एक दात आपल्या बाजूस वाकवा, दक्षता : पटाशीला धार लागली किंवा नाही ते पटाशी नखावर घासून तपासून पहा. संदर्भ : शिक्षक हस्तपुस्तिका - इयत्ता ९ वी-v2, पानं नं. १५७-१७३. शिक्षक हस्तपुस्तिका - इयत्ता ९ वी-V1, पानं नं. १३६-१३७. १६