पान:अभियांत्रिकी.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३) हँगर तयार करणे. (४) कुंडी स्टँड तयार करणे. (५) मेणबत्ती स्टँड तयार करणे. (६) बांगड्यांसाठी स्टॅन्ड तयार करणे. अपेक्षित कौशल्येः (१) वेल्डींग आर्क करता येणे अपेक्षित आहे. (२) काटकोनी गुण्या व मोजमापानुसार वेल्डींग कामे करणे. (३) सुरक्षिततेचे नियम व साधने वापरता येणे आवश्यक. शिक्षक कृती: वेल्डींग प्रात्यक्षिक घेण्यापूर्वी निदेशकाने पूर्व तयारी करावी. वेल्डींग मशीन एकच असते, अशावेळी गटामधील विद्यार्थ्यांचे उपगट तयार करून घ्यावेत. प्रत्येक उपगटामधे २ ते ३ विद्यार्थी असावेत. त्यानुसार जॉबची संख्या ठरवावी. उदा.: एका उपगटाला कटींग करणे, ६ एम.एम. रॉड, दुसरा गट अँगलची कटिंग व जुळवणी करणे. एक गट वेल्डींग करताना स्वतः वेल्डींग करून मुलांना दाखवणे व नंतर वरील गटाप्रमाणे विभागणी करणे म्हणजे वेल्डींग काम शिकत असताना इतर विद्यार्थी काम करत असतील व वेल्डींग करतेवेळी घाईगडबड होणार नाही याची निदेशकांनी काळजी घ्यावी. विशेष माहिती : वेल्डींग मशीनद्वारे जॉब व इलेक्ट्रोड यांना विद्युत प्रवाहाचा पुरवठा केला जातो. जेव्हा दोन्हींचा एकमेकांशी स्पर्श होतो व त्यानंतर ताबडतोब जर इलेक्ट्रोड ३ ते ६ मि.मी. वर उचलल्यास जॉब व इलेक्ट्रोडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विद्युत-विरोध होतो. परिणामतः आर्कच्या स्वरूपात विद्युत शक्तीचे रूपांतर होते. या आर्कचे तापमान जवळ जवळ ४०००° सेंटिग्रेड इतके असते व हे तापमान जॉबचा आणि इलेक्ट्रोडचा धातू वितळवण्यास पुरेसे असते. ___ फ्लक्समध्ये १५% सेल्युलोजिक पदार्थ असतो. या पदार्थामुळे आर्कचे पेनिट्रेशन (घुसणे) अधिक खोलीपर्यंत होते व आर्कसुद्धा त्वरित तयार होते. इलेक्ट्रोडचे दोन प्रकार - (१) उघडे (Bare) इलेक्ट्रोड (२) कोटेड (Coated) इलेक्ट्रोड आर्क वेल्ड करताना सुरक्षिततेचे नियम : (१) विद्युत यंत्र हाताळताना त्याचे ज्ञान असल्याशिवाय हाताळू नये. ते अर्थला जोडले पाहिजेत. (बॉडी) (२) यंत्र चालू असताना कनेक्शन करताना इलेक्ट्रीक विभागाची मदत घ्या. (३) स्वतःच्या संरक्षणासाठी हॅण्डस्क्रीन, सेफ्टी बूट, हातमोजे यांचा वापर करावा. (४) जॉबवर आलेला स्लॅग (थर) काढण्यासाठी चिपींग हॅमरचा उपयोग करावा. (५) स्लॅग काढताना त्याचे कण डोळ्यात उडू नये म्हणून चिपींग गॉगल वापरावा. वेल्डींग मशीनचा पाण्याशी संबंध येऊ देऊ नये. आर्क वेल्डींग मशीन जवळ कोणालाही खेळू देऊ नये, (८) वेल्डींगसाठी ३०-३५ हरेल्ट व ६० ते २०० अॅम्पिअर (जॉबच्या व रॉडच्या आकाराप्रमाणे) प्रवाह वापरतात. प्रात्यक्षिकाचे नाव : १. आर्क तयार करणे (Striking anArc) उद्दिष्टे: (१) आर्क तयार करणे. (२) आर्क स्थिर ठेवणे. साहित्य : (१) मृदू पोलादी पट्टी ७५४७५४१० मि.मी.-२ नग (२) मृदू पोलादी इलेक्ट्रोड ४ मि.मी. (फ्लक्स आवरणाचे)- १ नग ११ (६)