________________
|| || • मेट्रिक (एम.के.एस.) पद्धती (मीटर किलोग्रॅम सेकंद या इंग्रजी शब्दांचे अद्याक्षर घेऊन बनलेले लघुरूप) • आंतरराष्ट्रीय (एस.इ.) पद्धती ब्रिटिश (एफ.पी.एस.) पद्धती : ही पद्धत मुख्यतः युनायटेड किंग्डम आणि अमेरिकेत वापरली जाते. या पद्धतीत फूट, पौंड व सेकंद ही तीन मूलभूत एकके आहेत. या मूलभूत एककापासून योग्य ती नवीन एकके बनवता येतात. उदा. गतीचे एकक फूट व सेकंद वापरून 'फूट सेकंद' असे बनविता येते. मेट्रिक (एम.के.एस) पद्धती : येथे मीटर, कीलोग्रॅम व सेकंद ही एकके (युनिटस्) आहेत. आजच्या काळात जवळपास सर्व देशांत ही पद्धत वापरण्यावर भर आहे. या पद्धतीचा एक मोठा फायदा म्हणजे एकके दहाच्या पटीत असतात. त्यामुळे मापन करणे सोपे जाते. १० मि.मी. = १ सें.मी. १० सें.मी. = १डेसी.मी. १० डेसी.मी. = १ मीटर १० मीटर = १डेका मीटर १० डेका मीटर = १ हेक्टोमी. १० हेक्टो मीटर = १ कि.मी. आंतरराष्ट्रीय (एस.आय.) पद्धत : ही पद्धत जगभरातील मापन पद्धतीत समानता आणण्यासाठी आणि मुख्यत्वे संशोधनात वापरण्यासाठी तयार केली गेली आहे. या पद्धतीत आणि मेट्रिक पद्धतीत थोडी समानता आहे. निरीक्षण करा (१) सोनार वापरतो तो तराजू, किराणा मालाचा तराजू. व नोंदी लिहा : (२) शर्यतीमध्ये स्टॉपवॉच घड्याळाचा वापर करतात. (सेकंद व पॉईंट मोजणे.) हे करून पहा: (१) हाताच्या वितीने अंतराचा अंदाज घ्यावा. (२) चालत जाऊन अंदाजे अंतर मीटरमध्ये सांगा. (३) सुतळी अथवा दोरा वापरून अंतर मोजा. संदर्भ : (१) सामान्य विज्ञान, इयत्ता ६ वी, प्रकरण ४ : मापन, पान नं.३४ ते ४३, प्रकाशन २००७. (२) शिक्षक हस्तपुस्तिका (V-1), इयत्ता ९वी, पान नं. ४८ ते ५२. (३) शि.ह.पु.(V-1), इयत्ता १० वी, पान नं.४८ ते ५०. (४) पॅक्टीकल हँडबुक, पान नं.१ ते ९. (५) विद्युत अभियांत्रिकी व इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाची मूलतत्वे (V-3), पान नं.१६२-१६४. दिवस : दुसरा प्रात्यक्षिकाचे नाव : वेल्डींग-आर्क स्ट्राईक करणे,स्पॉट मारणे (लोखंडी तुकडे जोडणे) प्रस्तावना : औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रत्येक दिवशी अत्याधुनिकतेमध्ये भर पडत आहे. प्रत्येक ट्रेडला त्याच्या उपयुक्ततेनुसार महत्त्व आहे. परंतु वेल्डींग हा असा विभाग आहे की, ज्याचा संबंध लहान वर्कशॉपपासून मोठ्या इंडस्ट्रीमध्ये असणे आवश्यक असते. वेल्डींगचे तंत्र आत्मसात होण्यासाठी प्रैक्टिकलबरोबर थिअरीचे ज्ञान असणे आवश्यक असते, तरच चांगला व कुशल वेल्डर तयार होऊ शकतो. निदेशकांनी करावयाची पूर्वतयारी: (१) जॉबचे मटेरिअल कटिंग व ड्रिलिंग करून झाल्यानंतर वेल्डींगसाठी जॉब तयार ठेवावा. (२) वेल्डींगसाठी वेल्डींग जॉब व सुरक्षिततेचे साधन व्यवस्थित आहे का ते तपासून घ्यावे. (३) लाईटच्या वेळापत्रकानुसार प्रात्यक्षिकांची तयारी करावी. उपक्रम निवड करणे :(१) चौकोनी स्टूल तयार करणे. (२) चप्पल स्टँड तयार करणे. १०